Sunday, July 14, 2024

जान्हवी कपूरने बिकिनी फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, पुन्हा रंगली बोल्डनेसची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने चार वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. चार वर्षात तिने तिचा खास चाहता वर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावर देखील ती मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे बोल्ड तसेच पारंपारिक फोटो शेअर करून ती नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित करत असते. अशातच तिने पुन्हा एकदा सोशल मीडियावर तिच्या बोल्ड फोटोंनी आग लावली आहे.

जान्हवी कपूरने (janhvi kapoor) तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, फ्लोअरल प्रिंट बिकिनीमध्ये पाण्यात दिसत आहे. या फोटोमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिच्या या अदा खूप आवडल्या आहेत. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (janhvi kapoor share her bold bikini photos on social media)

मागील काही दिवसांपूर्वी जान्हवीने तिचे काही फोटो शेअर केले होते. त्यात ती स्विमिंग पूलमध्ये गुलाबी रंगाची बिकिनी घालून पोझ देताना दिसत होती. तिचे हे फोटो देखील सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते.

नुकतेच तिने पोस्ट करून सांगितलेले होते की, तिला आणि तिची बहीण ख़ुशी कपूरला कोरोना झाला आहे. परंतु आता त्या दोघीही सुखरूप आहेत.

जान्हव्हीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती सध्या तिच्या आगामी अनेक प्रोजक्टमध्ये व्यस्त आहे. ती येणाऱ्या काळात ‘गुड लक जेरी’, ‘दोस्ताना’ आणि ‘तख्त’ या चित्रपटात दिसणार आहे. याआधी ती ‘रुही’ या चित्रपटात राजकुमार रावसोबत दिसली होती. तिने ‘धडक’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली होती. या एकाच चित्रपटाने तिला चांगली ओळख निर्माण करून दिली. ‘धडक’ हा चित्रपट मराठीमधील ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. हिंदीमधील प्रेक्षकांनी चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला होता.

हेही वाचा :

 

हे देखील वाचा