Saturday, July 19, 2025
Home बॉलीवूड खुशी मुखर्जीने शेअर केला भीतीदायक अनुभव; रात्री अंधारात कोणी तरी पाहत होतं

खुशी मुखर्जीने शेअर केला भीतीदायक अनुभव; रात्री अंधारात कोणी तरी पाहत होतं

खुशी मुखर्जी (Khushi Mukherjee)नेहमी तिच्या वेगळ्या फॅशनमुळे ट्रोल होते. अलीकडे तिच्या एका लुकवर लोकांनी भरपूर टीका केली.

अभिनेत्री खुशी मुखर्जी नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिला तिच्या ड्रेसमुळे ट्रोल केलं गेलं, अगदी फोटोग्राफर्सनीही तिला झापलं. ती बऱ्याच वर्षांपासून इंडस्ट्रीत आहे आणि आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिनं आपल्या आयुष्यातली एक धक्कादायक गोष्ट शेअर केली होती.

Galatta ला दिलेल्या मुलाखतीत खुशीला विचारलं गेलं की, 2015 मध्ये भोपालमध्ये काय झालं होतं? त्यावर ती म्हणाली, “मी ‘सत्ता परिवर्तन’ या चित्रपटाचं शूटिंग करत होते. मी एका साध्या हॉटेलमध्ये राहात होते, फाइव स्टार नव्हतं. तिथे रूममध्ये डबल लॉक करावं लागायचं, पण मी विसरले.

कोणी तरी रूममध्ये आलं आणि मला काही कळलंच नाही. मी जेव्हा वळले तेव्हा पाहिलं की कोणी तरी मला एकटक बघत होतं. मी जोरात किंचाळले! आधी वाटलं भूत आहे! काहीच समजत नव्हतं, खूप अंधार होता आणि तो पळून गेला. माझ्या किंकाळ्या ऐकून शेजारचा माणूस बाहेर आला.”

पुढे खुशी म्हणाली, “मी लगेच रूम सर्व्हिसला फोन करून सांगितलं की, माझ्या रूममध्ये कोणी तरी आलं होतं. पण त्यांनी सांगितलं, ‘मॅडम, कोणीच नव्हतं.’ मग मी म्हणाले, ‘सीसीटीव्ही चेक करा, असं कसं कोणी नाही?’ तेव्हाच माझी नजर जिन्यावर पडली, तिथं एक तुटलेली चप्पल होती. मग मी त्यांना सांगितलं, ‘तुमचा सगळा स्टाफ वर पाठवा.’ त्यांनी २-३ लोकांना वर पाठवलं. त्यात एक मुलगा असा होता की त्याच्या पायात चप्पलच नव्हती.

मी त्याला विचारलं, ‘चप्पल कुठे आहे?’ तर तो काहीतरी बोलून विषय बदलायला लागला. मग मी सरळ विचारलं, ‘रूममध्ये येणारा तूच होतास का?’ त्यावर त्याने कबूल केलं, ‘हो, मीच होतो.’ तो म्हणाला त्याचं वय 14-15 आहे, पण तो दिसायला 18-19 वाटत होता. मी विचारलं, ‘असं का केलं?’ तर तो म्हणाला, ‘मला दीदी खूप आवडते.’ मग मी त्याला सांगितलं, ‘दीदीला भेटायचं असेल, तर असा वेळ आणि असा प्रकार योग्य नाही ना!’”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा 

हिरोइन करीना हवीच! अक्षयची अट, निर्मात्याचं टेन्शन

हे देखील वाचा