अलीकडेच दिग्दर्शक पहलाज निहलानी (Pahlaj Nihalani) यांनी एक धक्कादायक गोष्ट सांगितली, त्यांनी म्हटलं की, अक्षय कुमारनं ‘तलाश’ (Talaash) चित्रपटात करीना कपूरला घ्यावं म्हणून जबरदस्ती दबाव टाकला होता.
2002 मध्ये आलेल्या ‘तलाश’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत होते. आता अलीकडेच चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितलं की, त्या वेळी अक्षयने कास्टिंगमध्ये हस्तक्षेप केला होता आणि करीना कपूरला घेतलं जावं म्हणून दबाव टाकला होता. जाणून घेऊया नक्की काय घडलं होतं.
सीबीएफसीचे (केंद्रीय फिल्म प्रमाणन मंडळ) माजी अध्यक्ष आणि चित्रपट निर्माता पहलाज निहलानी यांनी अलीकडेच ‘लर्निंग विथ द लिजेंड’ या पॉडकास्टमध्ये एक मोठा खुलासा केला. ते म्हणाले, “आधीचे हिरो कधीच हिरोईन कोण असावी यामध्ये ढवळाढवळ करत नसत. पण हे सगळं बदलायला सुरुवात झाली ती अक्षय कुमारपासून. ‘तलाश’ या चित्रपटासाठी त्याने खास सांगितलं होतं की, हिरोईन म्हणून फक्त करीना कपूरच हवी!” त्यांच्या म्हणण्यानुसार, आता हिरो लोक फक्त अभिनय करत नाहीत, तर सगळं काही तेच ठरवतात, दिग्दर्शक कोण, हिरोईन कोण, टीममध्ये कोण असावं… सगळं!
पहलाज निहलानी म्हणाले, “पूर्वी चित्रपटात कोण काम करणार हे निर्माता आणि दिग्दर्शक ठरवायचे. हिरो काही मध्ये बोलत नसे. पण 2002 मध्ये ‘तलाश’ चित्रपटासाठी अक्षय कुमार पहिल्यांदा असा हिरो होता ज्याने कास्टिंगमध्ये हस्तक्षेप केला. त्याने मला स्पष्ट सांगितलं, ‘आपण उद्याच शूटिंग सुरू करू शकतो, तुम्ही मला कितीही पैसे द्या, पण हिरोईन करीना कपूरच हवी.’
‘तलाश’ त्या काळातली एक महागडी फिल्म होती, जवळपास 22 कोटी खर्च आला होता. माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं होतं की, एखाद्या अभिनेत्याने हिरोईनसाठी अट घातली होती. पुढे पहलाज म्हणाले, “आजकाल तर सगळं हिरोच ठरवतो, दिग्दर्शक कोण, हिरोईन कोण, टेक्निशियन कोण सगळं! आता हे पूर्णपणे हिरोचं गेम झालंय.
आणि जेव्हा त्यांना विचारलं की, अक्षयला करीना कपूरच का हवी होती, तेव्हा ते म्हणाले, ‘कधी कधी जेव्हा अभिनेत्याचं वय वाढायला लागतं, तेव्हा ते लहान वयाच्या हिरोईनसोबत काम करतात, म्हणजे स्वतःचं वय कमी दिसावं’. “जेव्हा पहलाज निहलानी यांना विचारलं की, “गोविंदा घमंडी होते का?” तेव्हा त्यांनी सांगितलं, “गोविंदा खरतर घमंडी नव्हते, पण ते थोडे इनसिक्योर होते, म्हणजे त्यांना सतत भीती वाटायची की काहीतरी चुकू नये, किंवा काही हातातून जाऊ नये.
त्यांचे वडील महबूब खान एक मोठे हिरो होते आणि त्यांनी निर्माता म्हणून खूप मोठा तोटाही सहन केला होता. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष केला. त्यातूनच गोविंदामध्ये ही भीती आणि अस्थिरता आली होती. त्यामुळे ते थोडं टेन्शनमध्ये राहायचे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रिलीज पूर्वीच वॉर २ झाला सुपरहिट ;इतक्या कोटींना विकले गेले हक्क…