Tuesday, April 8, 2025
Home बॉलीवूड लग्न न करताच सलमानने बदलले कियाराचे नाव, नक्की काय आहे प्रकरण?

लग्न न करताच सलमानने बदलले कियाराचे नाव, नक्की काय आहे प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचा (kiara aadwani) आज वाढदिवस आहे. ३१ जुलै रोजी कियारा तिचा ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. कियारा अडवाणी आज इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. आयुष्यातील हे स्थान तिने आपल्या मेहनतीने मिळवले आहे. कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिच्या आयुष्यतील काही रंजक माहिती..

कियारा अडवाणीचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. या अभिनेत्रीचे खरे नाव कियारा नसून आलिया आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे. इंडस्ट्रीसाठी तिने तिचे करिअर बदलून आलिया ते कियारा केले आहे. कारण आलिया भट्ट आधीच तिच्यासोबत इंडस्ट्रीत आहे आणि ती हिट देखील आहे. याच कारणामुळे पहिल्या चित्रपटाच्या वेळीच त्याने आपले नाव आलियावरून बदलून कियारा असे ठेवले होते. विशेष म्हणजे अभिनेता सलमान खानने कियाराला तिचे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.

प्रियांका चोप्राच्या ‘अनजाना अनजानी’ या चित्रपटाने प्रभावित होऊन कियाराने हे नाव निवडले आहे. कियारा अडवाणीने ‘फगली’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. मात्र, कियाराचा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर अभिनेत्रीला पुढील चित्रपट मिळण्यातही खूप अडचणी आल्या. कियाराला तिची खरी ओळख ‘कबीर सिंग’ या चित्रपटातून मिळाली. कबीर सिंगच्या यशानंतर कियाराच्या कारकिर्दीला पंख फुटले.

यानंतर कियारा अडवाणीला ‘गुड न्यूज’, ‘भूल भुलैया 2’, ‘शेरशाह’, ‘जुग जुग जिओ’ सारख्या सुपरहिट चित्रपटांच्या ऑफर मिळाल्या आणि आता तिने बीटाउनच्या टॉप अभिनेत्रींमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.

अधिक वाचा-
अभिनयाच्या पहिल्या नाही, तर दुसऱ्या संधीत चमकले होते कियारा आडवाणीचे नशीब; जाणून घ्या तिचा सिनेप्रवास
काय सांगता! राजेश खन्ना अन् मुमताज यांच्या ‘या’ सिनेमातील क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी लागले होते आठ दिवस

हे देखील वाचा