Thursday, June 13, 2024

काय सांगता! राजेश खन्ना अन् मुमताज यांच्या ‘या’ सिनेमातील क्लायमॅक्स सीनच्या चित्रीकरणासाठी लागले होते आठ दिवस

चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने कलाकार नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. देशात परदेशात शूटिंग होणे खूपच सामान्य झाले आहे. जेव्हा कलाकार बाहेर जाऊन शूटिंग करतात तेव्हा त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रत्येक येणाऱ्या अडचणींवर मात करत काम करावे लागते. कारण बाहेर शूटिंगच्या वेळी त्या ठिकाणच्या परवानग्या घेतलेल्या असतात, त्यासाठी योग्य ती रक्कम द्यावी लागते. त्यासाठी कलाकरांना त्यांच्या कमिटमेंट पाळाव्याच लागतात. आऊटडोर शूटिंग करताना कलाकरांना नैसर्गिक संकटाना देखील तोंड द्यावे लागते. मात्र असे असूनही आपले कलाकार त्यांचे काम पूर्ण निष्ठेने पार पडतात. शूटिंगदरम्यान किस्से देखील खूप घडत असतात जे कलाकार आणि चित्रपटाच्या टीमच्या कायम स्मरणात राहतात. असाच एक किस्सा बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार असणाऱ्या राजेश खन्ना यांच्या बाबतीत ‘रोटी‘ चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने घडला होता.

हा किस्सा आहे, राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या सुपरहिट ‘रोटी’ चित्रपटाशी संबंधित. राजेश खन्ना आणि मुमताज यांनी जवळपास दहा सिनेमे सोबत केले. या दोघांची जोडी देखील सुपरहिट होती. मुमताज यांनी या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर किस्सा एका मुलाखतीदरम्यान सर्वांना सांगितला. या सिनेमाच्या शूटिंगच्या वेळचा हा किस्सा खूपच मजेशीर आणि राजेश खन्ना, मुमताज यांच्यातल्या गोड भांडणाचा आहे.

rajesh khanna
Photo Courtesy: YouTube/ScreenGrab/shemaroo

‘रोटी’ सिनेमाच्या एका सीनमध्ये राजेश खन्ना यांना मुमताज यांना त्यांच्या खांद्यावर उचलून चालायचे होते. पण हा सीन शूट करण्यासाठी त्यांना आठ दिवसाचा कालावधी लागला होता. या सिनेमाचा क्लायमॅक्स सीनमध्ये मुमताज यांना खांद्यावर घेऊन राजेश खन्ना यांना बर्फात पाळायचे होते. जेव्हा या सीनची शूटिंग सकाळी सुरु व्हायची तेव्हा राजेश खन्ना मुमताज यांना म्हणायचे की, “ये जाडी चल ये.” लगेच मुमताज देखील उडी मारून त्यांच्या खांद्यावर बसायच्या. हा सीन शूट करण्यासाठी त्यांना आठ दिवस लागले. यादरम्यान ते दोघं खूप हसायचे, मजा मस्ती करायचे.

मुमताज यांनी सांगितले की, “बर्फात मला उचलून चालणे राजेश खन्नांसाठी खूपच अवघड होते. मी शूटिंग सुरु झाली की, राजेश खन्ना यांच्यासोबत मजाक करायला सुरुवात करायची. ‘आता उचला खांद्यावर १०० किलोची गोनी’ असे मी नेहमी त्यांना बोलायची. त्यावर राजेश खन्ना म्हणायचे, “इतकी जड पण नाहीये तू.” मात्र तवा मी खूप स्लिम अजिबातच नव्हती.” राजेश खन्ना हे बॉलिवूडचे पाहिले सुपरस्टार होते त्यांनी एकापाठोपाठ एक असे १५ सिनेमे सुपरहिट दिले होते. त्यांचे हे रेकॉर्ड आजही तसेच आहे.

अधिक वाचा-
काय सांगता! संजय दत्तचे होते 308 अफेअर; अभिनेता झाला होता ‘या’ अभिनेत्रींच्या प्रेमात वेडा
नशिबाची थट्टा! फरदीन खान वयाच्या 49व्या वर्षी घेणार घटस्फोट; मोडणार 18 वर्षांचा संसार?

 

 

हे देखील वाचा