Saturday, July 6, 2024

वाढदिवसानंतर घराबाहेर स्पॉट झाली कियारा आडवाणी; चाहत्यांना भावला पिंक सुटमधला हा सिंपल लूक

कालच शनिवारी (३१ जुलै ) अभिनेत्री कियारा आडवाणी हिने तिचा वाढदिवस साजरा केला आहे. यानिमित्त तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच तिने तिच्या मित्रांसोबत वाढदिवस साजरा केला आहे. हे सगळे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोत तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा देखील उपस्थित होता. अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेयरची चर्चा चालू होती. त्यात त्यांनी एकत्र वाढदिवस साजरा केल्याने आता माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. यातच कियारा रस्त्यावर स्पॉट झाली आहे . तिचा एका व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून कियाराचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या गाडीतून उतरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कियारा गाडीतून बाहेर उतरते. तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला आहे. तसेच ड्रेसला मॅचिंग चप्पल घातलेली आहे. हातात आकाशी रंगाची बॅग घेतलेली आहे. तसेच तिने मास्क लावलेला आहे. पॅप्पराजी तिला थांबायला सांगतात तसेच तिला शुभेच्छा देतात. ते तिला पोझ देण्यासाठी सांगतात. तसेच ते तिला मास्क काढायलाही सांगतात, पण ती मास्क काढत नाही. ते तिला म्हणतात की, “मॅम आम्ही खूप लांब आहोत मास्क काढा.” तरी देखील ती मास्क काढत नाही आणि पुढे निघून जाते. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर कंमेंट करत आहेत.

कियारा सध्या तिच्या ‘शेरशाह’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा दिसणार आहे. हा चित्रपट १२ ऑगस्टला ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. कियाराने ‘एम एस धोनी द : अनटोल्ड स्टोरी’, ‘कबीर सिंग’, ‘लक्ष्मी’, ‘गिल्टी’, ‘भूल भुलैया २’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका चोप्रा ते स्वरा भास्करपर्यंत, बॉलिवूड इंडस्ट्रीतील ‘ही’ रहस्ये वाचून उंचावतील तुमच्या भुवया!

-प्रार्थना बेहेरेच्या ‘आपली यारी’ गाण्याला रसिकांचा तुफान प्रतिसाद; दोन दिवसातच ओलांडला २ मिलियन व्ह्यूजचा टप्पा

-फ्रेंडशिप डे स्पेशल: बॉलिवूडमधील या कलाकारांची मैत्री पाहून तुम्हालाही वाटेल हेवा, करण-काजोलही आहेत यादीत सामील

हे देखील वाचा