Thursday, April 18, 2024

हुबेहूब हॉलिवूड स्टार किम कार्दशियनसारखे दिसण्याच्या अट्टाहासाने घेतला ‘या’ जगप्रसिद्ध मॉडेलचा जीव

हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन सारखी दिसणारी मॉडेल क्रिस्टीना एश्टनचे वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. प्लास्टिक सर्जरीनंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समजत आहे. हॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किम कार्दशियनला ओळखले जाते. संपूर्ण जगात तिचे कोट्यवधी फॅन्स आहेत. अनेक मुलींना तर तिच्यासारखे दिसण्याची देखील इच्छा असते. अशीच इच्छा होती मॉडेल क्रिस्टीना एश्टनची. तिची ही इच्छा खूपच मोठी होती आणि म्हणूनच तिने प्लस्टिक सर्जरीचा आधार घेतला.

प्लस्टिक सर्जरीनंतर क्रिस्टीना किम कार्दशियनसारखी दिसत होती, मात्र पूर्ण किम नव्हती. यासाठी तिने जगभर फिरुन अनेक प्लास्टिक सर्जरी करुन घेतल्या होत्या. या अनेक सर्जरी केल्यानंतर ती हुबेहुब किम कार्दशियनसारखी दिसू लागली होती. किमची डुप्लिकेट म्हणून तिची ओळख झाली आणि तिच्या फॅन फॉलोविंगमध्येही वाढ झाली होती. क्रिस्टीनाचे सोशल मीडियावर तब्बल सहा लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ashten G. (@ashtens_empire)

मॉडेल क्रिस्टीना एश्टनने किम कार्दशियन सारखे दिसणायसाठी केलेल्या सर्जरींवर तब्बल ११.१२ कोटी रुपये खर्च केले होते. यात तिची कॉस्मॅटिक सर्जरी केली गेली होती. एवढ्या सर्जरी केल्यानंतर क्रिस्टीनाला अनेक मेडिकल समस्या देखील जाणवू लागल्या होत्या.

क्रिस्टीना एश्टनच्या निधनाची बातमी तिच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सर्वांना दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “२० एप्रिल रोजी पहाटे ४.३० च्या सुमारास आमच्या कुटुंबातील एका व्यक्तीचा फोन आला. क्रिस्टीना मरत आहे…असे तो फोनवर सांगत होता. तिच्या निधनाने आमच्या कुटुंबावर मोठी शोककळा पसरली असून, आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.”

दरम्यान नुकतेच प्लस्टिक सर्जरीमुळे कॅनेडियन अभिनेता सेंड वॉनचे देखील निधन झाले. त्याने BTS सिंगर जिमिन सारखे दिसण्यासाठी तब्बल १२ सर्जरी केल्या होत्या. क्रिस्टीनाच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-

धक्कादायक! ‘या’ सुपरस्टार अभिनेत्याला निर्मात्यांनी केले बॅन, अभिनेत्याची लिखित प्रतिक्रिया व्हायरल

जेलमधील ‘त्या’ कटू अनुभवांना सांगताना क्रिसनला अश्रू अनावर, कॉफीसाठी टॉयलेटचे पाणी तर…

हे देखील वाचा