Thursday, July 18, 2024

चित्रपटांपेक्षा अफेअर्समुळेच जास्त चर्चेत राहिली किम शर्मा, ‘या’ क्रिकेटरसोबत होती ४ वर्ष रिलेशनमध्ये

हिंदी चित्रपटक्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या चित्रपटांपेक्षा प्रेमप्रकरणामूळेच जास्त चर्चेत असतात. याच अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे किम शर्मा. किम शर्मा आपल्या चित्रपटांपेक्षा कथीत प्रेमप्रकरणांमुळेच जास्त चर्चेत राहिली आहे. ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते. यावरून ती आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो शेअर करताना दिसत असते. जाणून घेऊया तिच्या अशाच काही प्रेमप्रकरणांबद्दल.

बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा (kim sharma) सिनेसृष्टीतील जून्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मात्र तिला आपल्या अभिनयाची विशेष छाप सिनेसृष्टीत पाडता आली नाही. ‘मोहब्बते’ चित्रपटातून तीने अभिनय क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर ती या क्षेत्रात आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावेल असा अंदाज अनेकांनी लावला होता. मात्र हा अंदाज तिला खरा ठरवता आला नाही. चित्रपटात येण्यापूर्वी किम शर्मा एक प्रसिद्ध मॉडेल होती. मात्र ‘मोहब्बते’ नंतर ‘तुमसे अच्छा कौन है’  सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटात काम मिळूनही तीला आपल्या अभिनयाची छाप पाडता आली नाही. हळूहळू ती या क्षेत्रांपासून लांब गेली. मात्र इतर कारणांमुळे ती सतत चर्चेत राहिली. आजही ती सोशल मीडियावर आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. आपल्या अनेक प्रेमप्रकरणांमूळे ती चर्चेत राहिली आहे.

क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत होती रिलेशनशिपमध्ये

अभिनेत्री किम शर्मा आणि युवराज सिंगच्या प्रेमप्रकरणाची दिर्घकाळ चर्चा रंगली होती. दोघेही ४ वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. मात्र २००७ मध्ये त्यांच ब्रेकअप झाल. युवराजच्या आईला किम पसंद नसल्याने त्यांच ब्रेकअप झाल अशा ही बातम्या त्या काळात समोर आल्या होत्या.

२०१० मध्ये केलं होतं लग्न..

किम शर्माने २०१० मध्ये केनियाचा उद्योगपती अली पुंजानीसोबत विवाह केला होता. मात्र अली पुंजाना आधीपासूनच विवाहित होता. त्याला तीन मुलही होती मात्र किम शर्मासोबत विवाह करण्यासाठी त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. किमसोबतचा विवाह जास्त काळ टिकू शकला नाही. किमने २०१६ मध्ये पुंजानीला घटस्फोट देत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. अली पुंजानीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर किम दिर्घकाळ कॉर्लोस मार्टिनला डेट करत होती. दोघ लग्नही करणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या मात्र त्यांचा विवाह होऊ शकला नाही.

हर्षवर्धन राणेसोबतही जोडले गेले होते नाव…

किम शर्मा अनेकदा तिच्यापेक्षा वयाने चार वर्ष लहान असलेल्या अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतही फिरताना दिसून आली होती. त्यांच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा रंगली होती. मात्र दोघांनीही याबाबत कधीही प्रतिक्रिया दिली नाही.

किम शर्मा आणि अमितला गोव्यामध्ये एकत्र पाहिले होते. मात्र यामुळे प्रेमप्रकरणाची चर्चा सुरु झाल्यानंतर आम्ही योगायोगाने त्या ठिकाणी एकत्र आल्याची माहीती अमितने त्यावेळी दिली होती. दरम्यान अलिकडेच किमने लिएंडर पेसला डेट करत असल्याची माहिती दिली होती. अशा अनेक कारणांनी ती नेहमी चर्चेत असते.

हेही वाचा :

हे देखील वाचा