Friday, June 14, 2024

गौरी आणि सुहानासह अहमदाबादहून मुंबईला परतला किंग खान, फोटॊ व्हायरल

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शाहरुख खान अहमदाबादहून मुंबईला परतला आहे. शाहरुख खान उष्माघात आणि डिहायड्रेशनमुळे आजारी पडला. शाहरुख खान कसा आणि कोणासोबत मुंबईत पोहोचला हे जाणून घेऊया.

गुरुवारी उष्माघातामुळे शाहरुख खानची प्रकृती खालावली. आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होताना दिसत आहे. आज शाहरुख खान पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खानसोबत मुंबईत परतला आहे.

मुंबई विमानतळावर शाहरुख खानची एक झलक पाहण्यासाठी पापाराझी आतुर झाले होते, मात्र शाहरुख खानला छत्रीने झाकून गाडीपर्यंत नेण्यात आले. यावेळी, आम्हाला त्यांची मुलगी सुहाना खानची एक झलक नक्कीच मिळाली.

कडेकोट बंदोबस्तात शाहरुख खानला मुंबई विमानतळावरून त्याच्या निवासस्थानी नेण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानच्या कारसमोर पोलिसांची गाडी जात होती. आता किंग खानच्या चाहत्यांमध्ये काहीसा दिलासा पाहायला मिळत आहे.

आज शाहरुख खानची मॅनेजर आणि मैत्रिण पूजा ददलानीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट केले होते. त्यांनी लिहिले होते, ‘श्री खान यांच्या सर्व चाहत्यांसाठी आणि हितचिंतकांसाठी एक आनंदाची बातमी, ते ठीक आहेत. तुमच्या सर्व प्रेम, प्रार्थना आणि काळजीबद्दल धन्यवाद.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

फराह खानने बॉलीवूडच्या सर्वात कंजूस अभिनेत्याचा केला खुलासा; म्हणाली, ‘मला 500 रुपये द्या…’
माही विज बनली कास्टिंग काउचची शिकार, रेट कार्ड बनवल्यानंतर आला क्रूझवर जाण्याचा प्रस्ताव

हे देखील वाचा