Monday, February 26, 2024

‘ऍनिमल’ला स्त्रीविरोधी म्हटल्यावर संदीप रेड्डी यांचे किरण रावला प्रत्युत्तर; म्हणाले, ‘आमिर खान चित्रपटात महिलेला जबरदस्ती…’

‘ॲनिमल’ हा 2023 सालातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक आहे. संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. त्याचबरोबर काही लोक या चित्रपटावर जोरदार टीकाही करत आहेत. बॉलीवूडमधील अनेक मोठी नावे आता उघडपणे ‘ॲनिमल’ला महिलाविरोधी चित्रपट म्हणू लागली आहेत. या यादीत आमिर खानची माजी पत्नी किरण रावचेही (Kiran Rao)नाव जोडले गेले आहे.

अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान किरण रावने ‘ॲनिमल’ चित्रपटाला महिलाविरोधी चित्रपट म्हटले होते. किरणचे हे विधान चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना पटले नाही आणि त्यांनी किरण राववर जोरदार निशाणा साधला आणि आमिर खानवरही निशाणा साधला.

आमिर खानची माजी पत्नी किरण राव हिने एका मुलाखतीदरम्यान ऍनिमल चित्रपटाला महिला विरोधी म्हटले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांना त्यांचे शब्द पचवता आले नाहीत. या विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलताना संदीप म्हणाला, ‘जेव्हा तुम्हाला काहीच कळत नाही, तेव्हा तुम्ही गप्प बसा. जर कोणी जाऊन किरणला आमिर खानचा ‘दिल’ चित्रपट बघायला सांगितला तर तिला समजेल की हा चित्रपट किती स्त्रीविरोधी आहे.

संदीप आपले बोलणे चालू ठेवत म्हणाला, ‘आमिर खानने फार पूर्वी एक गाणे केले होते, ‘खंभे जैसी खडी है… लडकी है या फुलझाडी है’ किरण, आमिरला या गाण्याचा अर्थ विचारा आणि मग ‘ऍनिमल’ बद्दल बोला. इतकंच नाही तर ज्या मुलीसोबत आमिर खान ‘दिल’ चित्रपटात जबरदस्ती करायला तयार होतो, नंतर चित्रपटात तीच मुलगीही आमिरच्या प्रेमात पडते. आता सांगा कोणता चित्रपट स्त्रीविरोधी होता.

संदीप रेड्डी यांचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट पिता-पुत्राच्या गुंतागुंतीच्या नात्याभोवती विणलेला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने मुलाची भूमिका साकारली असून अनिल कपूर त्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला आहे. या चित्रपटात रणबीरच्या वडिलांवर जीवघेणा हल्ला होतो, तेव्हा तो वडिलांच्या शत्रूंकडून कसा बदला घेतो, हे ‘ॲनिमल’मध्ये मोठ्या तपशिलाने दाखवण्यात आले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पूनम पांडे जिवंत असल्याचा केआरकेचा मोठा दावा, पुरावे देखील केले सादर
जेव्हा दिग्दर्शकाने वहीदा रहमान यांना सांगितले सापाला किस करायला, ‘अशी’ होती अभिनेत्रीची प्रतिक्रिया

हे देखील वाचा