Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

किरण खेर यांचे ‘हे’ बोलणे ऐकून लाजेने लाल झाले धर्मेंद्र, व्हिडिओ झाला व्हायरल

धर्मेंद्र बॉलिवूडचे हिमॅन. अगदी ब्लॅक अँड व्हाईट काळापासून धर्मेंद्र प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. धर्मेंद्र यांचा अभिनय आणि त्यांच्या ऍक्शनचे आजही दिवाने आहेत. वयाच्या ८६ व्या वर्षी देखील धर्मेंद्र यांचा उत्साह आणि फिटनेस वाखाणण्याजोगा आहे. त्यांचे गबरू व्यक्तिमत्व आजच्या नवीन पिढीतील कलाकारांना देखील आकर्षित करताना दिसते. या वयातही धर्मेंद्र चित्रपटांमध्ये सक्रिय आहे, ते अनेक कार्यक्रमांना हजेरी लावताना देखील दिसतात. नुकतीच धर्मेंद्र यांनी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ (India’s Got Takent 9) या शोमध्ये हजेरी लावली होती.

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये परीक्षकांची भूमिका निभवणाऱ्या किरण खेर (Kirron Kher) यांनी या शोमध्ये धर्मेंद्र यांच्यावर कौतुकाची सुमने उधळली आहे. सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून या शोच्या एका भागाचा एक प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात किरण खेर या धर्मेंद्र यांची भरभरून स्तुती करताना दिसत आहे. त्यांनी धर्मेंद्र यांना हँडसम म्हणत सांगितले, “धरम जी यांचे व्यक्तित्व एक किलर कॉम्बिनेशन असून, ते मनाने खूपच चांगले आहे. कोणती पण स्त्री त्यांच्याकडे कसे दुर्लक्ष करू शकत नाही इतके चांगले व्यक्ती आहे धर्मेंद्र.” हे एकूण धर्मेंद्र खूप हसतात, त्यांच्याकडे या गोष्टींवर काय बोलावे हेच सुचत आणि ते लाजेने गुलाबी होतात. धर्मेंद्र यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी या व्हिडिओवर कमेंट्स करत धर्मेंद्र यांचे कौतुक करत असून, किरण खेर या योग्यच बोलल्याचे सांगत आहे.

या भागाचे अनेक प्रोमो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ते नेटकऱ्यांना खूप आवडत आहे. जसे धर्मेंद्र शोमध्ये एन्ट्री मारतात तशा किरण खेर त्यांना भेटायला स्टेजवर जातात आणि त्यांच्या हाताला किस करतात. त्यानंतर किरण खेर आणि धर्मेंद्र हे दोघे स्टेजवर शोले सिनेमातील एक सीन रिक्रिएट करताना दिसते. या सीनमध्ये धर्मेंद्र वीरू आणि किरण खेर बसंती बनल्या होत्या. १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा