‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रींच्या चार महिन्याच्या मुलाला झाला कोरोना, सोशल मीडियावरून दिली माहिती

नवीन वर्षाची सुरुवात दमदार तर झाली, मात्र सोबतच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने हातपाय पसरायला देखील सुरुवात झाली आहे. सामान्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वच लोकं कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. टेलिव्हिजन आणि सिनेमा दोन्ही इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार कोरोनाग्रस्त होत असताना, काही दिवसांपूर्वीच टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता नकुल मेहताचा (Nakul Mehta) ११ महिन्याचा मुलगा सुफी कोरोनाग्रस्त झाला. आता तव इंडस्ट्रीमधून अजून एक धक्कादायक बाब समोर आली आहे, ज्यात अभिनेत्री किश्वर मर्चंटचा (Kishwer Merchant) चार महिन्याचा मुलगा देखील कोरोनानेग्रस्त झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

किश्वर मर्चंटने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. किश्वर आणि सुयश यांचा चार महिन्याचा मुलगा निरवैर कोरोना पॉझिटिव्ह झाला आहे. सध्या किश्वर आणि सुयश त्यांच्या मुलाची देखभाल करत आहे. किश्वरने ९ जानेवारी रोजी त्यांच्या डेटिंग ऍनिव्हर्सरीच्या दिवशी तिने पोस्ट शेअर करत या कठीण काळात सुयश तिच्यासाठी मोठा आधार ठरत असल्याचे सांगितले आहे. सोबतच तिचे आणि सुयशने खास बॉंडिंग देखील तिने सर्वांसमोर शेअर केले आहे. किश्वरने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “मी सुयशला ११ वर्षांपासून ओळखत असून, तो आता खूपच बदलला आहे. सुयश खूपच मॅच्युअर आणि समजुदार झाला, जबाबदार आणि प्रेमळ बनला आहे. पाच दिवसांपूर्वी निरवैरची आया असणाऱ्या महिलेला कोरोना झाला, आणि त्यानंतर जे झाले ते कोणत्याही संकटापेक्षा कमी नव्हते. आमच्याकडे काम करणाऱ्या स्त्री देखील क्वॉरंटीन झाली. त्यानंतर आमच्यासोबत राहणार सुयशचा साथीदार सिडसुद्धा कोरोनाग्रस्त झाला. त्यानंतर तर सर्वातच वाईट झाले.”

View this post on Instagram

A post shared by Kishwer M Rai (@kishwersmerchantt)

पुढे किश्वरने लिहिले, “निरवैरला देखील कोरोना झाला. त्यानंतर आम्ही दोघं सोडून घरात कोणीच स्वयंपाक करायला साफ सफाई करायला निरवैरची मदत करायला त्याला सांभाळायला कोणी नाही. सुयश सर्वात बेस्ट जोडीदार आहे. त्याच्याच साथीने आम्ही आमचे हे वाईट दिवस चांगल्या पद्धतीने पार करत आहोत. त्याने मला प्रत्येक गोष्टीत मदत केली. त्याने सिड आणि संगीतासाठी नाश्ता बनवला, मला पाठीचा मसाज करून दिला. मला सांभाळले, माझ्यासोबत उभा राहिला, स्वतः निरवैरची काळजी घेत मला आमाला वेळ दिला. त्याला झोपवून भांडी देखील घासत आहे. मला त्याच्यावर गर्व आहे. खूप आनंद आहे, ११ वर्षांपूर्वी तुला भेटली, लग्न केले. एक सांगू इच्छिते मी आणि निरवैर तुझ्यावर खूप प्रेम करतो.”

किश्वर आणि सुयश अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी २०१६ साली लग्न केले आणि चार महिन्यांपूर्वी ते निरवैरचे आईबाबा बनले.

हेही नक्की वाचा-

Latest Post