सलमान खानच्या आगामी ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशात हा चित्रपट अवघ्या काही दिवसातच चाहत्याच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे ‘येंतम्मा’ (yentamma song) हे गाणे आज म्हणजेच मंगळवारी (दि. 4 एप्रिल)ला रिलीज झाले असून ते साेशल मीडियावर माेठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या गाण्यात सलमान खान, राम चरण आणि व्यंकटेश लुंगी डान्स करताना दिसत आहेत.
या गाण्याच्या रिलीजची माहिती सलमान खान (salman khan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. सलमानने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘यंतम्मा गाणे आऊट.’ या गाण्यात राम चरण (ram charan) आणि व्यंकटेश (venkatesh) याच्यासोबत सलमान खान जबरदस्त स्टाइलमध्ये दिसत आहे.
सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा बहुप्रतिक्षित चित्रपट 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. आत्तापर्यंत या चित्रपटातील ‘नईयो लगदा’, ‘बिल्ली मांजर’, ‘फॉलिंग इन लव्ह’ आणि ‘बथुकम्मा’ अशी अनेक गाणी रिलीज झाली आहेत. आता या यादीत ‘येंतम्मा’ या गाण्याचाही समावेश आहे.
View this post on Instagram
‘येंतम्मा’ गाण्यातील सलमानचा लूक आणि डान्स चाहत्यांना खूप आवडला आहे. साेशल मीडिया युजर्स या गाण्यावर भन्नाट कमेंट करून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हे या वर्षातील सर्वोत्कृष्ट गाणे ठरेल.’, तर आणखी एका युजरने लिहिले की, ‘साँग ऑफ द इयर.’
‘येंतम्मा’ गाण्यात सलमान खान, राम चरण आणि व्यंकटेश पिवळा शर्ट आणि लुंगी घातलेले दिसत आहेत. या तिन्ही स्टार्ससोबत पूजा हेगडेही या गाण्यात डान्स करताना दिसत आहे. एकंदरीत हे गाणे रसिकांसाठी मनोरंजनाचा जबरदस्त डोस आहे.(kisi ka bhai kisi ki jaan yentamma song out bollywood actor salman khan ram charan and venkatesh shake a leg )
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘धक धक गर्ल’ने पारंपारिक वेशभूषेत जिंकले चाहत्यांचे मन, फाेटाे गॅलरी पाहाच
‘लागिरं झालं जी’ फेम शिवानी बावकरचा साेज्वळ अंदाज, पाहून तुम्ही पडाल प्रेमात