Thursday, June 13, 2024

कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे नीरू बाजवा; एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ लाख रुपये

पंजाबी चित्रपटातील सुपरस्टार नीरू बाजवा चाहत्यांच्या हृदयावर राज्य करते. तिच्या चाहत्यांची यादी खूप मोठी आहे. नीरूने तिच्या अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. नीरूने अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्थान मिळवले आहे. नीरू शनिवारी (26 ऑगस्ट) 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. नीरू बाजवाने बॉलिवूडमध्ये ‘मैं सोला बरस की’ या चित्रपटातून पदार्पण केले होते, पण आज नीरूला पंजाबी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा मानले जाते. चला तर मग आज अभिनेत्रीच्या वाढदिवशी या लेखातून जाणून घेऊया तिच्या संपत्तीबद्दल…

नीरूची संपत्ती
अभिनेत्री नीरू आज कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, नीरूची संपत्ती सुमारे 15 ते 20 दशलक्ष आहे. नीरू एका चित्रपटासाठी जवळजवळ सुमारे 70 लाख रुपये घेते. त्याचबरोबर पंजाबी गाण्यांमध्ये डान्स करण्यासाठी नीरू मोठ्या प्रमाणात मानधन घेते. परंतु या मानधनाबद्दल अजूनही अधिकृत माहिती नाही. (Know About Actress Neeru Bajwa Net Worth And Her Luxury House And Car Collection)

नीरूची गाडी आणि घर
नीरूचे कॅनडात स्वतःचे एक आलिशान घर आहे. याशिवाय भारतातही तिचे घर आहे. नीरूकडे आलिशान कारचे कलेक्शन आहे. त्यात मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू, रेंज रोव्हर यांसारख्या महागड्या गाड्या आहेत.

नीरू बाजवाने साल 2015 मध्ये हॅरी जंवाधासोबत लग्न केले होते. नीरूचे लग्न झाल्यापासून ती अनेकवेळा तिच्या पतीसोबत कॅनडामध्ये असते. त्याचबरोबर लग्न होण्याआधी तिचे प्रसिद्ध अभिनेता अमित साथसोबत अफेअर होते. दोघांच्या अफेअरबद्दल बरीच चर्चा होत असायची. आता नीरू तीन मुलींची आई आहे. परंतु ती आता फक्त चित्रपटांमध्ये काम करते. नीरू ‘अस्तित्व एक प्रेम की’, ‘जीत’, ‘नच बलिये 1’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये देखील दिसून आली होती. तिने झी टीव्ही, स्टार प्लस आणि स्टार वन या चॅनलसोबत अनेक मालिकांमध्ये देखील काम केले होते.

इतकेच नव्हे, तर नीरूने विवेक ओबेरॉयसोबत ‘प्रिन्स’ या चित्रपटामध्ये आणि अक्षय कुमारसोबत ‘स्पेशल 26’ या चित्रपटामध्ये काम केले आहे. नीरूला विशेषतः ‘जट्ट आणि ज्युलियट’ आणि त्याचा पुढचा भाग ‘जट्ट आणि ज्युलियट 2’ या चित्रपटामुळे तिला जास्त ओळख मिळाली आहे.

हेही नक्की वाचा-
पॅपराझींची हाक ऐकताच अनन्या पांडे लाजून झाली लाल, व्हिडिओ एकदा पाहाच
मराठी मालिकेतील बाप हरपला; ‘पुढचं पाऊल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

हे देखील वाचा