Monday, October 2, 2023

पॅपराझींची हाक ऐकताच अनन्या पांडे लाजून झाली लाल, व्हिडिओ एकदा पाहाच

ड्रीम गर्ल 2‘ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. ‘ड्रीम गर्ल’ हा 2019चा हिट चित्रपट ठरला होता, यामध्ये आयुष्मान खुराना यांच्या सोबत नुसरत भरुचा महत्वाच्या भूमिका केला होता. यावेळी ईदच्या दिवशी पूजा पुन्हा लोकांच्या मनात घर करण्यासाठी सज्ज झाली. ‘ड्रीम गर्ल 2‘ चित्रपटगृहात दाखल झाला आहे. एकता कपूर निर्मित या चित्रपटात अनन्या पांडे आणि आयुष्मान खुराना यांची जोडी चाहत्यांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

रोमँटिक कॉमेडी चित्रपटाला ट्विटरवर चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने पूजाने पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. काल रात्री मुंबईत ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, तिथून अनन्या पांडेचा (Ananya Pandey) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पापाराझींचे बोलणे ऐकून अनन्या पांडे अचानक लाजलेला दिसत आहे. अनन्या सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनन्याचा नुकताच एक व्हिडिओ तूफैान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पापाराझी आदित्य रॉय कपूर या अभिनेत्रीला चिडवताना दिसत आहेत. इतकंच नाही तर तो अभिनेत्रीला ‘आशिकी-2’च्या अभिनेत्यासोबत मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर पोज देण्याची विनंती करत आहे. 24 ऑगस्टच्या रात्री आदित्य रॉय कपूरही चित्रपटाच्या स्क्रिनिंगला आला होता. मात्र, दोघांनीही कॅमेऱ्यासमोर एकत्र येणे टाळले. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहते सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. एका यूजरने कमेंट केली की, “आदित्य त्याची गर्लफ्रेंड अनन्या पांडेला सपोर्ट करायला आला आहे. कितना स्वीट बॉयफ्रेंड आहे हा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी एका यूजरने लिहिले की, ” अनन्या आदिचे नाव ऐकून खूप लाजते वाटत”. आणखी एका यूजरने लिहिले की, “आदित्य आणि अनन्या हे खूप गोड जोडपे आहेत”. या दोघांच्या जोडीवर चाहते सतत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. अनन्या विषयी बोलायच झाले तर,तिला अभिनय येत नाही आणि तिचे वडील चंकी पांडे यांच्या सदिच्छामुळे तिला चित्रपट मिळाले. (Ananya Pandey blushed as soon as she heard the call of the paparazzi)

अधिक वाचा- 
मराठी मालिकेतील बाप हरपला; ‘पुढचं पाऊल’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन
पहिल्याच दिवशी ऍडव्हान्स बुकिंगमध्ये ‘जवान’ने केली तब्बल इतक्या काेटींची कमाई; वाचून तुम्ही व्हाल थक्क

हे देखील वाचा