करीना कपूर (kareena kapoor) महागडी अभिनेत्री आहे. करीनाने २००० साली रेफ्युजी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून आजपर्यंत या २० वर्षात करीनामध्ये, तिच्या अभिनयामध्ये आणि तिच्या संपत्तीमध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आज करिना तिचा वाढदिवस साजरा करत आहे, जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास माहिती..
करीनाने तिच्या करियरमध्ये बॉलिवूडला अनेक नवीन ट्रेंड दिले. तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये आणि प्रेक्षकांच्या मनात तिने तिचे स्थान पक्के केले. करीना आज कोणत्याही बाबतीत मागे नाही. मग संपत्तीच्या बाबतीत ती कशी मागे राहील?
२००४ मध्ये तिच्याकडे ७४.४७ कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली होती. फोर्ब्जच्या सर्वात पॉवरफूल सेलिब्रिटींच्या यादीत तिने सातवा नंबर पटकवला होता. आता तिच्याकडे ४१३ कोटींची संपत्ती असल्याची नोंद झाली आहे. सोळा वर्षात करीनाचे संपत्ती अनेक पटींनी वाढली आहे. तिला वेगवेगळ्या हँडबॅग्ज खरेदी करायला खूप आवडतात. तिच्याकडे हँडबॅग्जचे खूप मोठे कलेक्शन आहे. एका बॅग्स साठी करीना लाखो रुपये मोजते . तिला खासकरून जिमी चू, कॅमियो क्लच, टॉड डी बॅग आणि चॅनल मिनी या ब्रॅण्डच्या बॅग्स खूप आवडतात.
View this post on Instagram
शिवाय तिच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्यात दोन BMW सोबत लेक्सस, टोयोटा लॅंड क्रूजर आणि पोर्शे सारख्या अनेक लग्जरी गाड्या आहेत. त्यातील BMW ही कार सैफ अली खानने तिला गिफ्ट केली होती. तर दुसरी BMW तिला सलमान खानने ‘दबंग २’ मध्ये काम केल्यासाठी दिली होती. करीनाला वेस्टर्नमध्ये डेनिम आणि जॅकेट्स खूप आवडतात. तिचा यातला आवडता ब्रँड म्हणजे, डॉल्सी एंड गबाना आणि गूची आहे. भारतीय पेहरावासाठी करीनाला डिजाइनर मनीष मल्होत्राचे ड्रेसस आवडतात.
View this post on Instagram
करीना तिच्या कुटुंबासोबत बांद्राच्या फॉर्च्यून बिल्डिंगमध्ये राहते. तिच्या राहत्या घराची किंमत ४३ करोड रूपये इतकी आहे. यांच्यासोबतच त्यांचे स्विटजरलॅंड मध्ये देखील एक मोठे घर आहे, ज्याची किंमत 33 करोड रूपये आहे. मात्र त्यांना आता त्याचे राहते घर लहान पडत असल्याने ते लवकरच त्यांच्या नवीन घरात राहायला जाणार आहे.
करीना लवकरच लाल सिंह चड्ढा सिनेमात झळकणार आहे. या सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडमधील ‘या’ सुपरहिट चित्रपटांना नाकारून करीना कपूरने केली मोठी चूक, आज होतोय पश्चाताप
क्रिती सेननचा मस्ती मूड! पाहा परदेशवारीचे व्हायरल फोटो
ना काश्मीर फाईल्स, ना आरआरआर; भारताकडून ऑस्करसाठी यंदा ‘या’ गुजराती चित्रपटाने मारली बाजी