Friday, November 22, 2024
Home कॅलेंडर तब्बल ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक आहेत सुपरस्टार नागार्जुन; घरच नाही, तर गाड्यांचीही किंमत कोटींच्या घरात

तब्बल ‘इतक्या’ कोटी संपत्तीचे मालक आहेत सुपरस्टार नागार्जुन; घरच नाही, तर गाड्यांचीही किंमत कोटींच्या घरात

साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपल्या उत्कृष्ट अभिनयाने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागार्जुन (Nagarjun) यांनी आपल्या दमदार अभिनयाने भारतीय सिनेमा खूप उंचावला आहे. जगात असे मोजकेच अभिनेते आहेत, जे आपले पात्र अशा उत्साहाने बजावतात की, प्रेक्षकांच्या नजरा त्यांच्यापासून हटत नाहीत. नागार्जुन  (29 ऑगस्ट) आपला 62 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज या लेखात आपण नागार्जुन यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया…

अभिनेते नागार्जुन हे एक उत्तम अभिनेते आहेत. त्याचबरोबर ते एक निर्माता आणि नाट्य कलाकार देखील आहेत. त्यांचा पहिला टॉलिवूड चित्रपट 1986मध्ये प्रदर्शित झाला आणि त्यांच्या अभिनयाचे जगभर कौतुक झाले. केवळ भारतातच नाही, तर जगभरात नागार्जुन यांच्या अभिनयाचे कौतुक केले जाते. ते भारतातील सर्वाधिक मानधन घेणारे अभिनेते आहेत. (Know About South Superstar Akkineni Nagarjuna Net Worth)

एकूण संपत्ती
माध्यमांतील वृत्तानुसार, नागार्जुन हे सुमारे 800 कोटींचे मालक आहेत. त्यांच्या कमाईचा बहुतांश भाग चित्रपट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येतो. नागार्जुन हे आपल्या चित्रपटाच्या शुल्कासह नफ्यातील काही हिस्सा घेतात. ते ब्रँडच्या एंडोर्समेंटसाठी प्रचंड शुल्क आकारतात. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. ज्यामुळे ते सिनेमाचे एक प्रतिभावान आणि बहुमुखी अभिनेते आहेत. धर्मादाय आणि सामाजिक कार्यातही नागार्जुन आघाडीवर आहेत.

नागार्जुन यांचे घर
नागार्जुन हैदराबादच्या प्रमुख भागात राहतात. त्यांचे घर हैदराबादच्या फिल्म नगरमध्ये आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराची किंमत सुमारे 42.3 कोटी रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त भारत देशात त्यांची आणखी संपत्ती आहे.

कारची आवड
अभिनेते नागार्जुन यांच्याकडे आलिशान कार आहेत. त्यांच्याकडे बीएमडब्ल्यू-7 सीरिज आणि ऑडी ए-7 आहे. त्यांच्या प्रत्येक कारची किंमत 1 ते 2.5 कोटी रुपये इतकी आहे.

नागार्जुन यांचे चित्रपट
अभिनेते नागार्जुन यांच्या सुपरहिट चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ‘विक्रम’, ‘मंजू’, ‘सिवा’, ‘गुन्हेगार’, ‘जखम’, ‘मास’, ‘शिर्डी साई’, ‘मनम’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

नागार्जुनप्रमाणेच त्यांचा मुलगा आणि सूनही साऊथ इंडस्ट्रीचे स्टार आहेत. नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्यचा विवाह समंथा प्रभूशी झाला आहे. दोघेही इंडस्ट्रीमध्ये त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात. नागा चैतन्य लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

हेही नक्की वाचा-
सुपरहिट चित्रपट देऊन नागार्जुनने जिंकली चाहत्यांची मने; लग्न झालेले असतानाही होता ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात
विवाहित असूनही नागार्जुन पडले अमला यांच्या प्रेमात; थेट परदेशात जाऊन केले होते प्रपोज

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा