Thursday, April 18, 2024

रणबीरने राजामौली अन् नागार्जुनसोबत घेतला साऊथ इंडियन जेवणाचा आस्वाद, प्रमोशनसाठी गाठली चेन्नई

प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरचा (Ranbir Kapoor)आणि अलिया भट्टचा ब्रम्हास्त्र हा चित्रपट लवकरच रिलिझ होतो आहे. यासाठी सध्या तो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच रणबीर कपूर त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी चेन्नईत आल्यावर नागार्जुन (Nagarjuna)आणि एसएस राजामौली (S.S.Rajamouli)यांच्यासोबत खास दाक्षिणात्त्य जेवणाता आस्वाद घेतला.

यावेळी चेन्नईमध्ये रणबीरचं ढोल वाजवत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले, यावेळी आपल्या प्रमोशनच्या दरम्यान तो नागार्जून आणि एसएस राजामौलीसोबत केळीच्या पानावर मस्त टेस्टी दाक्षिणात्त्य जेवण जेवला. तर अनेकांनी जेवताना त्याचा हा शांत स्वभाव पाहून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत रणबीर किती साधेपणाने जेवतो आहे असेही कमेंट केले आहे.

 

View this post on Instagram

 

 सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रणबीर केळीच्या पानावर साऊथ इंडियन जेवण पारंपरिक पद्धतीने खाताना दिसत आहे. एसएस राजामौली आणि नागार्जुन त्यांच्या शेजारी बसले होते. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर मुख्य भूमिकेत आहे, तर नागार्जुन यांचीही भूमिका आहे. नागार्जुनने जवळजवळ दोन दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर ब्रह्मास्त्र या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे.

नागार्जुनने याआधी सांगितले होते की, “सुरुवातीला मी हे करण्याबाबत थोडासा साशंक होतो, पण नंतर अयान घरी आला आणि त्याने ते माझ्यासमोर मांडले. मी म्हणालो की मला फक्त एक कॅमिओ करायचा नाही, पण जेव्हा त्याने माझ्यासमोर ते सादर केले तेव्हा संपूर्ण स्क्रिप्ट अप्रतिम आणि चमकदार दिसत होती. तोपर्यंत त्याने त्याचे थोडेसे चित्रीकरण केले होते. त्याने मला दाखवले आणि मी लगेच ‘हो’ म्हणालो, त्यानंतरही मी मागेपुढे पाहिले नाही.’

एसएस राजामौली हा चित्रपट तेलगू, तामिळ, कन्नड आणि मल्याळमसह सर्व दक्षिणी भाषांमध्ये सादर करत आहेत. अयान मुखर्जी दिग्दर्शित, हा चित्रपट रणबीरचा पत्नी आलिया भट्टसोबतचा पहिला चित्रपट देखील आहे. ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक कर
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘…मी माफी मागतो’, आलियाला वाढत्या वजनावरून चिडवून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला रणबीर; आता मागितली माफी
मृणालचा क्लासी लूक; पाहा फोटो गॅलरी!
दाऊदची एक्स गर्लफ्रेंड बॉयकॉट ट्रेंडवर बरळली; म्हणाली, ‘या सगळ्याला कारणीभूत बॉलिवूड कलाकारांचा राग’

हे देखील वाचा