Saturday, July 27, 2024

बाप रे! बाराशेपेक्षा अधिक गाणी गाऊन मिळवली प्रतिष्ठा, ‘त्या’ एका कृत्याने घालवली सगळी इज्जत

गायक आणि भजन सम्राट अनूप जलोटा (Anoop jalota) यांनी संगीत क्षेत्रात त्यांचे खास असे स्थान निर्माण केले आहे. ऐसी लागी लगन हे भजन गाऊन त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे हे भजन सम्राट आज म्हणजेच २९ जुलैला त्याचा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी अनेक गजल, चित्रपटांची गाणी गाऊन त्यांचा चाहता वर्ग तयार केला आहे. अनूप जलोटा हे भारतीय संगीतातील असेच एक नाव आहे, ज्यांच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. अनूप जलोटा यांनी भजनांबरोबरच चित्रपटांमध्येही गायन केले आणि आपली खास ओळख निर्माण केली. अनुप जलोटा यांचे गुरू आणि वडील पुरुषोत्तम दास जलोटा हे सुप्रसिद्ध भजन गायक होते. चला तर मग जाणून घेऊया वाढदिवसाच्या या खास प्रसंगी भजन गायक अनूप जलोटा यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी-

नैनीताल येथे जन्मलेल्या अनूप जलोटा यांचे पालन-पोषण अशा एका कुटुंबात झाले आहे, जिथे नेहमीच शास्त्रीय संगीतातील दिग्गज लोकांचे आणे-जाणे असायचे. त्यांचे सहा भाषांमध्ये १२०० पेक्षा अधिक भजन आणि १५० पेक्षा गजल अल्बम झाले आहेत.

अनुप जलोटा यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा दिवस असा होता, जेव्हा त्यांचा आवाज अभिनेता मनोज कुमारने ऐकला होता. मनोज कुमार यांना अनूप जलोटा यांचा आवाज इतका आवडला की त्यांनी ‘सिर्दी के साई बाबा’ चित्रपटातील अनूपचे गाणे ठेवले. हा चित्रपट ७० च्या दशकाच्या शेवटच्या वर्षांत आला होता. चित्रपट हिट झाल्याने अनूप जलोटा संगीतविश्वात मोठे नाव बनले आणि त्यांनी त्या काळातील सर्व मोठ्या संगीतकारांसाठी गाणे गायले.

अनूप जलोटा ऑल इंडिया रेडिओच्या पहिल्या ऑडिशनमध्ये अयशस्वी झाले होते, पण जेव्हापासून त्यांनी भजने गायला सुरुवात केली तेव्हापासून लोक त्यांच्या आवाजाच्या प्रेमात पडले. त्यांचे भक्तिसंगीत ऐकून त्यांची गणना महान संगीतकारांमध्ये होते. आजही त्यांच्या गझल लोकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.

अनुप जलोटा नेहमीच वादांपासून दूर राहतात, मात्र बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये ते वादात सापडले. बिग बॉसच्या १२व्या सीझनमध्ये अनूप जलोटाचे नाव ३० वर्षीय जसलीन मथारूशी जोडले गेले होते. या शोमध्ये एन्ट्रीसोबतच जसलीनने ती अनूप जलोटाची गर्लफ्रेंड असल्याचे सांगितले होते, मात्र शोमधून बाहेर पडल्यानंतर अनूपने स्पष्ट केले की जसलीन त्याची गर्लफ्रेंड नाही. जसलीन त्याच्याकडूनच संगीत शिकते आणि दोघांमध्ये गुरू-शिष्याचे नाते आहे.

अधिक वाचा- 
दीपिका पदुकोण हिने थेट अमिताभ बच्चन यांच्यावर केला चोरीचा आरोप; म्हणाली, ‘ते सेटवर…’
एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

हे देखील वाचा