Sunday, June 23, 2024

दीपिका पदुकोण हिने थेट अमिताभ बच्चन यांच्यावर केला चोरीचा आरोप; म्हणाली, ‘ते सेटवर…’

बाॅलिवूडची आत्ताची सर्वात टॉपची नायिका म्हणून दीपिका पदुकोण ओळखली जाते. तिने तिच्या अभिनयाच्या आणि सौदर्याच्या जोरावर चाहत्यांच्या मनात एक विषेश जागा निर्माण केली आहे. दीपिकाच्या डान्सची अदासुद्धा काही वेगळीच असतात ज्या चाहत्यांना भुरळ घालतात. दीपिकाने तिच्या ठुमक्यांनी अनेक अभिनेत्याला नाचायला भाग पाडले होते. दीपिकाने अनेक बड्या कलाकरांसोबत काम केले आहे. तिने अभिताभ बच्चन यांच्यासोबत देखील काम केले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की दीपिकाने चक्क अमिताभ बच्चन यांच्यावर चोरीचा आरोप केला आहे.

दीपिका ( Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन यांनी पिकू चित्रपटात एकत्र काम केले होते. सुभाष घई यांच्या या चित्रपटात वडील आणि मुलगी दोघेही भूमिकेत दिसले होते. त्याच्या या भूमिकेला लोकांनी चांगली पसंती दर्शवली. त्याच्या हा चित्रपट चांगला चालला. ऑफस्क्रीनही ही जोडी खऱ्या बाप-लेकीच्या जोडीपेक्षा कमी नाही. दोघांची मजा स्क्रीनच्या बाहेरही चालू असते. पण नुकताच दीपिकाने केलेल्या या आरोपामुळे सगळ्याचीच खळबळ उडाली आहे.

एकदा चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका अमिताभ बच्चन यांच्या शेजारी बसली होती. तेव्हा ती म्हणाली की, “अभिताभ बच्चन सेटवर तिचं जेवण चोरायचे.” हे एकून अभिताभ बच्चन त्यावेळी शांत बसले होते. पण पुन्हा एकदा असाच किस्सा घडला. तेव्हा अभिताभ बच्चन यांनी खूप मजेशीर उत्तर दिले. ते एकूण सगळे हसायला लागले.

अभिताभ बच्चन म्हणाले की, “सामान्य लोक दिवसातून तीन वेळा किंवा तीन तासांच्या अंतराने जेवण करतात. पण दीपिका दर 3 मिनिटांनी जेवण करते. तरीपण दीपिका इतके खाऊनही इतकी पातळ कशी आहे, याचे मला आश्चर्य वाटते.” यादरम्यान सर्वत्र हशापिकला. त्यानंतर अमिताभ यांनीही दीपिकाला उभे राहण्यास सांगितले आणि आपली चिंता व्यक्त करण्यासाठी हात वर करण्यास सांगितले. ज्यामुळे दीपिका विचारात पडली होती. (Deepika Padukone directly accused Amitabh Bachchan of theft)

अधिक वाचा- 
एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास
संजय दत्तला स्वत:ची मुलगीच म्हणू लागली होती ‘काका’, ‘या’ गोष्टीमुळे चिंतेत पडला होता अभिनेता

हे देखील वाचा