ज्यांचा आवाजच त्यांची ओळख होती, आज तो आवाज कायमचाच शांत झाला. वयाच्या ९२ व्या वर्षी लता मंगेशकर यांचे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. तब्बल ७ दशकं आपल्या सुरेल आवाजाने करोडो लोकांचे मनोरंजन करणाऱ्या आणि संगीत क्षेत्रावर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवलेली गान कोकिळा आज शांत झाली. दीदींच्या निधनानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीसोबतच सामान्य लोकं देखील स्तब्ध झाले आहे. ज्या आवाजाने प्रेक्षकांच्या आणि संगीत प्रेमींच्या मनावर राज्य केले त्या दीदी आज आपल्यात नाही. अगदी शून्यातून स्वतःचे विश्व निर्माण करणाऱ्या लता मंगेशकर यांनी संपूर्ण जगात स्वतःची मोठी ओळख निर्माण केली. आज जरी दीदी आपल्यात नसल्या तरी त्यांची गाणी सदैव आपल्यासोबत राहतील.
दीदींना वयाच्या १३ व्या वर्षी संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी ३६ भाषांमध्ये ५० हजारांहून अधिक गाणी गायली. लता दीदींच्या अत्युच्य अशा कारकिर्दीत त्यांनी अमाप यश, पैसा, नाव कमावले. अतिशय साधे जीवन जगणाऱ्या लता दीदींनी कोट्यवधींची संपत्ती कमावली होती. जेव्हा लता मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्याच्या करिअरची सुरुवात केली, तेव्हा त्यांना केवळ २५ रुपये मिळाले होते. त्यावेळी मंचावर त्यांनी त्यांचे गाणे सादर केले होते.एका माहितीनुसार त्यांच्याकडे ३७० कोटी रूपयांची संपत्ती आहे. लतादीदी या दक्षिण मुंबईतील पॉश अशा पेडर रोड येथील प्रभू कुंज इमारतीत राहत होत्या.
लता दीदी आणि त्यांचे कारवरील प्रेम तर सर्वश्रुत आहे. एका मुलाखतीमध्ये दीदींनी त्यांचे गाड्यांवर असलेले त्यांचे प्रेम व्यक्त केले होते. एवढंच नाही तर त्यांच्याकडे अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. त्यांनी सर्व प्रथम Chevrolet गाडी खरेदी केली होती. मुख्य म्हणजे दीदींनी ही कार त्यांच्या आईच्या नावावर खरेदी केली. त्यानंतर त्यांनी Buick आणि Chrysler या दोन गाड्या खरेदी केल्या. यश चोप्रा यांनी देखील लतादीदींना एक मर्सिडीज कार गिफ्ट म्हणून दिली होती.
लता मंगेशकर यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, “दिवंगत यश चोप्रा हे मला लहान बहिण समजायचे. ‘वीर-झारा’ या सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या दिवशी त्यांनी माझ्या हातात मर्सिडीज कारची चावी दिली आणि सांगितले की, तुमच्यासाठी ही भेटवस्तू आहे. त्यांनी दिलेली कार आजही माझ्याकडे आहे.”
हेही वाचा :