Saturday, September 30, 2023

अल्लू अर्जुनपासून ते समंथा रूथ प्रभूपर्यंत, करोडोंमध्ये फी घेणार्‍या कलाकरांची पहिली कमाई ऐकून व्हाल चकित

दाक्षिणात्य कलाकार भारतीय चित्रपटसृष्टीत धमाल करत आहेत. चाहत्यांना दाक्षिणात्य कलाकारांच्या अ‍ॅक्शनचे वेड असायचे, पण आता त्यांच्या अ‍ॅक्शनसोबतच अभिनय आणि स्टाइलचेही चाहते दिवाने झाले आहेत. आता साऊथचे स्टार्स फॅन फॉलोविंगच्या बाबतीतही बॉलिवूड स्टार्सना स्पर्धा देत आहेत. एवढेच नाही, तर साऊथचे स्टार्स चित्रपटासाठी बॉलिवूड स्टार्सप्रमाणे करोडोंमध्ये फी घेतात. पण आज आम्ही तुम्हाला टॉलिवूड स्टार्सच्या पहिल्या फीबद्दल सांगणार आहोत, हे जाणून तुम्ही थक्क व्हाल. (know these famous south indian celebrities first salary)

समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)
समंथा रुथ प्रभू ही एक लोकप्रिय दक्षिण भारतीय अभिनेत्री आहे, जी एका चित्रपटासाठी करोडोंचे मानधन घेते. पण तिचा पहिला पगार जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. समंथाचा पहिला पगार फक्त ५०० रुपये होता. इन्स्टाग्रामवर चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, समंथाने स्वतः हा खुलासा केला आहे. शाळेत एक शो होस्ट करण्यासाठी ५०० रुपये मिळाल्याचे तिने सांगितले होते.

samantha ruth prabhu
Photo Courtesy: Instagram/samantharuthprabhuoffl

सूर्या (Suriya Sivakumar)
सूर्या हा साऊथच्या महागड्या कलाकारांपैकी एक आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की, अभिनयात येण्यापूर्वी तो एका कपड्याच्या कारखान्यात काम करत होता. तिथे सूर्याचा पगार केवळ ७३६ रुपये प्रति महिना होता.

मोहनलाल (Mohanlal)
मोहनलाल हे दक्षिण इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते आहेत, जे गेली अनेक वर्षे अभिनय जगतात सक्रिय आहेत. मोहनलाल यांचा पहिला चित्रपट ‘मंजिल विरंजा पुक्कल’ होता, ज्यासाठी अभिनेत्याला २००० रुपये मिळाले होते. विशेष म्हणजे, ही रक्कम अभिनेत्याने एका अनाथाश्रमाला दान केली होती.

Photo Courtesy: Screengrab – YouTube/Saina Movies

थालापती विजय (Thalapathy Vijay)
थालापती विजय हा साऊथ इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याचे नावच चित्रपटांना हिट करण्यासाठी पुरेसे आहे. या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्याचा पहिला चित्रपट ‘वेत्री’ होता आणि त्याची पहिली कमाई ५०० रुपये होती.

Thalapathy-Vijay

अल्लू अर्जुन (Allu Arjun)

Allu Arjun
Allu Arjun

अल्लू अर्जुन जो पॅन इंडियाचा स्टार बनला आहे, त्याने चित्रपटांमध्ये ऍनिमेटर म्हणून काम केले आहे. या कामासाठी अभिनेत्याला पहिले वेतन ३५०० रुपये मिळाले. मात्र, आजच्या काळात अल्लू अर्जुन करोडोंच्या संपत्तीचा मालक आहे.

अधिक वाचा- 
बाबो!!! अल्लू अर्जुनकडून ‘पुष्पा 2’चा डायलॉग लीक, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
नाकातून गातो म्हणून टीकेचा धनी ठरणाऱ्या हिमेशला ‘भाईजान’ने दिलेला पहिला ब्रेक, 120सिनेमांना दिलंय संगीत

हे देखील वाचा