Friday, April 19, 2024

मिस युनिव्हर्सचा ताज जिंकत इतिहास रचणाऱ्या हरनाज सिंधुबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहे का?

आजची (१२ डिसेंबर) ची सकळ सर्व भारतीयांसाठी अतिशय आनंदाची आणि गौरवास्पद ठरली. तब्बल २१ वर्षानंतर भारतात पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स किताब आला आहे. पंजाब मधील हरनाज सिंधूने मिस युनिव्हर्सचा ताज पटकावत एक रेकॉर्डच केले आहे. नुकतीच ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा इस्त्रायलमध्ये संपन्न झाली. हरनाज सिंधू टॉप ३ मध्ये तिच्या हुशारीने आणि सौंदर्याने जागा बनवली. उपांत्य फेरीत हरनाजने साऊथ आफ्रिका आणि पारागुआ या दोन देशातील स्पर्धकांना मात देऊन हा किताब जिंकला आहे. मिस युनिव्हर्स बनलेली हरनाज सिंधूने हा ताज जिंकला आणि सगळीकडे हरनाज हरनाज हे एकच नाव ऐकायला मिळत आहे. चला तर मग जाणून घेऊया हरनाजबद्दल अधिक माहिती.

हरनाज सिंधूने कमी वयात गाठले उंच शिखर 
हरनाज सिंधूने खूप कमी वयामध्ये खूप मोठे शिखर गाठले. हरनाजचा जन्म चंदिगढ येथील एका शीख कुटुंबात झाला. लहानपणापासूनच तिला फिटनेस आणि योगाची खूप आवड होती. ती नेहमीच तिच्या तंदुरुस्तीची विशेष काळजी घ्यायची. ती फॅशनला घेऊन पण खूप सजग असायची. तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता.

हरनाज सिंधू १७ वर्षी मिस चंदिगड किताब जिंकला
हरनाज सिंधूने वयाच्या १७ व्या वर्षी मिस चंदिगडचा किताब जिंकला. याच्यानंतर ती चर्चांमध्ये आली. हा किताब तिने २०१७ मध्ये जिंकला. तेव्हापासून तिच्या या करिअरला सुरुवात झाली. पुढे हरनाजने २०१८ मध्ये मॅक्स इमेजिंग स्टार इंडियाचा ताज (मुकुट) जिंकला. मिस इंडिया २०१९ या इव्हेंटमध्ये पण ती सहभागी झाली. ज्याच्या मध्ये ती टॉप १२ मध्ये जागा बनवण्यात यशस्वी देखील झाली होती.

हरनाज सिंधूने विचारलेल्या प्रश्‍नावर दिले असे उत्तर
मिस युनिव्हर्सच्या पार पडलेल्या स्पर्धेमध्ये हरनाजला ज्या प्रश्नाने हा मुकुट मिळवून दिला, तो प्रश्न जाणून घेऊया. टॉप ३ स्पर्धकांना विचारले गेले की “दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही कोणता सल्ला द्याल?” यावर हरनाज सिंधू उत्तर दिले आजच्या तरुणांवर सर्वात मोठा दबाव आहे. या दबावाचा सामना करताना स्वतःवरती विश्वास ठेवायचा. तो विश्वास आपल्याला काहीतरी चांगले बनण्यास मदत करतो. आपण स्वतःची तुलना इतरांशी करणे थांबवले पाहिजे आणि जगभरातील महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नेते आहात म्हणून स्वतःसाठी बोलायला शिका. तुम्ही तुमचा आवाज आहेत. माझा स्वतःवर विश्वास होता म्हणूनच मी आज इथे उभी आहे.

भारताने मिस युनिव्हर्सचा किताब तिसऱ्यांदा मिळवला
हरनाज सिंधूच्या आधी दोन अभिनेत्री यांनी हा किताब भारताला जिंकून दिला होता. १९९४ मध्ये सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सचा मुकुट पटकावला तर लारा दत्ता २००० साली मिस युनिव्हर्स बनली. आता २१ वर्षानंतर हरनाजने हा मुकुट जिंकत नवीन इतिहास रचला आहे.

कमी वजनामुळे हरनाज सिंधू होती तणावमध्ये
तिने एका मुलाखतीत असे सांगितले होते की, तिचे वजन कमी असल्याने तिला नेहमीच तिच्या कमी वजनाबद्दल तणाव वाटत होता. या तणावाला तिने सकारात्मक पद्धतीने घेतले आणि यावर मत केली. ती म्हणाली की या कठीण काळात आपण एखाद्या माणसावर विश्वास ठेवावा आपण ज्याला आपल्या समस्या सांगू शकतो आणि तो व्यक्ती आपल्याला पुढे जाण्यास मदत करेल.

हरनाज सिंधू सर्व श्रेय तिच्या आईला देते
हरनाज सिंधू तिच्या यशाचे श्रेय व तिच्या आईला देते. २१ वर्षी हरनाजला पोहणे, घोडेस्वारी, अभिनय नृत्याची आवड होती. हरनाज सिंधूने दोन पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. मिस युनिव्हर्स २०२१ स्पर्धेत ७५ हून अधिक सुंदर महिलांनी भाग घेतला होता. हरनाज सिंधूने टॉप ३ मध्ये स्थान मिळवले आणि हा किताब जिंकला.

हेही वाचा-

Video: माधुरी दीक्षितने ‘लेझी लॅड’ गाण्यावर दाखवले भन्नाट मूव्ह्ज, एक्सप्रेशन्सही आहेत कमाल!

कधी वाळवंट, तर कधी समुद्रामध्ये रोमान्स करताना दिसली अंकिता; रोमँटिक प्री-वेडिंग शूट आले समोर

दोन हजार रुपयांपासून कमाईला सुरुवात करणारे रजनीकांत आज आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

हे देखील वाचा