Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड दीपिकाच्या आयुष्यात १४ ऑगस्ट ‘या’ कारणामुळे आहे खास; म्हणूनच जाते दरवर्षी बंगळुरूला

दीपिकाच्या आयुष्यात १४ ऑगस्ट ‘या’ कारणामुळे आहे खास; म्हणूनच जाते दरवर्षी बंगळुरूला

कलाकार आपल्या रोजच्या शूटिंगमध्ये कायमच व्यस्त असतात. रात्रंदिवस आपला चित्रपट हिट होण्यासाठी मेहनत घेत असतात. अशात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांना वेळ द्यायला जमत नाही. परंतु बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आपल्या कुटुंबियांसाठी दरवर्षी काही दिवस राखून ठेवते. दीपिका आपल्या अभिनयाबरोबरच कुटुंबीयांना वेळ द्यायला कधीच चुकत नाही. अशात दीपिका सध्या बंगळुरूला रवाना झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना तिचे अचानक बंगळुरूला जाण्यामागचे कारण जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे.

बंगळुरूमध्ये आहे दीपिकाचे एक खास काम
खरं तर दीपिका वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या आयुष्यातील खास दिवसांची दिनदर्शिकेवर नोंद करून ठेवते. बंगळुरूमध्ये दीपिकाचे कुटुंबीय राहतात. आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्याबरोबर काही खास दिवस व सणसमारंभ साजरे करण्यासाठी दीपिका बंगळुरूला गेली आहे. (Know Why Actress Deepika Padukone Made A Quick Trip To Bangalore)

दीपिकाच्या आयुष्यात १४ ऑगस्टला एवढं महत्व का?
दीपिकाच्या मनात तिच्या कामांना व कुटुंबीयांना समान स्थान आहे. अशात ऑगस्ट महिन्याच्या १४ तारखेला दीपिकाच्या आईचा वाढदिवस असतो. त्यामुळे दीपिका ऑगस्ट महिना सुरू झाला की, आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तयारीला लागते. आईचा वाढदिवस साजरा करत दीपिका तिच्या बहिणीबरोबर व बाबांबरोबर वेळ घालवते. ऑगस्ट महिन्यात गणेशोत्सव तसेच सर्वच सण सुरू होतात. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दीपिका आपल्या घरी बंगळुरूला धाव घेते.

दीपिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर दीपिका ‘द इंटर्न रिमेक’, ‘महाभारत’, ‘८३’मध्ये दिसणार आहे. तसेच ‘फायटर’सह ‘पठाण’ आणि शकुन बत्रा व नाग अश्विन यांच्या आगामी चित्रपटांत झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वातंत्र्यदिनानिमित्त चाहत्याने शेअर केला बिग बींचा ‘असा’ फोटो; ते पाहून अभिनेत्यालाही द्यावी लागली प्रतिक्रिया

स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी

बॉलिवूडमधील असे कलाकार ज्यांना लाभलीय लष्करी पार्श्वभूमी; सुष्मितापासून ते प्रियांकापर्यंत ‘यांचा’ आहे समावेश

हे देखील वाचा