Monday, July 8, 2024

वयाच्या 12 व्या वर्षीच करीना आमिरला करायची ‘तसले’ इशारे, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

करण जोहरचा (karan johar) चॅट शो ‘कॉफी विथ करण सीझन 7’ च्या पाचव्या भागात करीना कपूर खान आणि आमिर खान उपस्थित होते. यावेळी दाेघेही पहिल्यांदाच शोमध्ये एकत्र दिसले. या दरम्यान त्यांनी अनेक मजेदार किस्से शेअर केले. अशात मंगळवारी (दि. 14 मार्च)ला अभिनेता त्याचा 57वा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर यानिमित्त जाणून घेऊया मिस्टर परफेक्शनिस्टची करीनाचे संबध कसे हाेते.


एपिसोड दरम्यान, आमिर आणि करिनाने होस्ट करण जोहरसोबत मजेदार गप्पा मारल्या. एका सेगमेंट दरम्यान, करिनाने आमिरला त्याच्या स्वतःबद्दलच्या पहिल्या इंप्रेशनबद्दल विचारले. यावर उत्तर देताना आमिर म्हणाला, “अंदाज अपना अपना’च्या सेटवर बसलेली ती खरोखरच 12 वर्षांची गोंडस मुलगी होती, ही माझी पहिली धारणा होती. ती लोलो (करिश्मा) सोबत यायची आणि ती आमच्याकडे बोट दाखवायची. तर, ही माझी तुमच्यावरची पहिली छाप आहे.” ‘अंदाज अपना अपना’ 1994 मध्ये रिलीज झाला होता आणि त्यात आमिर खान, सलमान खान, करिश्मा कपूर आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत होते.

याशिवाय आमिरने खुलासा केला की, ‘लाल सिंग चड्ढा’मध्ये मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारण्यासाठी करिना ही त्याची पहिली पसंती नव्हती कारण तो तरुण चेहरा शोधत होता. एका सेगमेंट दरम्यान, चित्रपटाबद्दल बोलत असताना, करण जोहर आमिर खानला विचारतो, “करीना तुझी पहिली पसंत नव्हती, होती का?”

यावर आमिर खान म्हणाला, “नाही, कारण आम्ही खरोखर वयोगटाचा विचार करत होतो. दोन्ही पात्रांचा 18 ते 50 वर्षांच्या आयुष्याचा प्रवास आहे. सुरुवातीला आम्हाला वाटले की वय जितके लहान असेल तितके चांगले – म्हणून फक्त माझे वय असावे. आम्ही 25 वर्षांचा वयोगट पाहत होतो. जेणेकरून अभिनेत्री लहान-मोठी दिसू शकेल.

शो दरम्यान, आमिर खानने खुलासा केला की, “चित्रपटाच्या कास्टिंग डायरेक्टरने काही नवीन अभिनेत्रींचा उल्लेख केला आहे ज्या नवख्या होत्या. त्याने आम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवला. त्या जाहिरातीत करीनाही होती. मी आणि अद्वैत बघत होतो. आम्ही दुसऱ्या कोणाचा व्हिडिओ पाहत होतो. आणि ती मुलगी पण खूप छान होती पण जेव्हा आम्ही करीनाला तिच्यात पाहिलं तेव्हा आम्ही करीनामध्ये हरवून गेलो.” अशाप्रकारे त्यांनी अनुभव सांगितला आहे.(koffee with karan 7 aamir khan recalls his first impression of kareena kapoor and laal singh chaddha lead role)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘झूठा’ गाण्याच्या प्रदर्शनावेळी जोरजोरात रडली राखी सावंत म्हणाली, ‘मी संसाराची स्वप्न नाही पाहू शकत का?’

अनन्या अन् आदित्य राॅय कपूर रिलेशनशिपमध्ये? दाेघांचा ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा