Tuesday, July 9, 2024

चांदण्याच्या राती जंगलाच्या मध्यभागी रणबीरने केले होते आलियाला प्रपोज, अशी आहे ‘रणबेलिया’ची लव्हस्टोरी

करण जोहरने (karan johar) त्याचा मोस्ट अवेटेड शो ‘कॉफी विथ करण’ (coffee with karan) सीझन ७ दाखल केला आहे. वर्षाच्या ७ व्या महिन्याच्या ७ तारखेला त्यांनी या शोच्या ७व्या सीझनची सुरुवात दोन प्रसिद्ध स्टार्ससोबत केली. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चे दोन प्रमुख कलाकार आलिया भट्ट (alia bhatt) आणि रणवीर सिंग (ranveer singh) यांच्यासोबतच चित्रपट निर्माते त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना दिसले. संभाषणादरम्यान आलियाने रणबीर कपूरने (ranbir kapoor) तिला लग्नासाठी प्रपोज केले तो क्षणही शेअर केला. रणबीरने रोमँटिक पद्धतीने याची योजना कशी आखली याचा खुलासा तिने केला. आलिया भट्टने ‘कॉफी विथ करण’ च्या सीझन ७ मध्ये खुलासा केला आणि सांगितले की, रणबीर कपूरने तिला कसे प्रेमाने प्रपोज केले. लग्नाचा तो प्रस्ताव असा होता, ज्याचा त्याने विचारही केला नव्हता.

आलियाने संवादादरम्यान सांगितले की, “रणबीर आणि त्याचे नियोजन असे होते, ज्यामुळे मला आश्चर्य वाटले, कारण मी असा काही विचार केला नव्हता किंवा त्याची अपेक्षाही केली नव्हती.” आलिया पुढे म्हणाली की “आम्ही याबद्दल बोलतही नव्हतो, कारण जेव्हा आम्ही याबद्दल बोलत होतो तेव्हा महामारी आली आणि नंतर उशीर झाला. त्यामुळे आम्ही आता यावर बोलायचे नाही असे ठरवले आणि रणबीरने तेच केले.”

पुढे सांगितले की, “त्याने याबद्दल कोणालाही सांगितले नाही, फक्त अंगठी घेतली आणि लग्नासाठी प्रपोज करण्यासाठी एक अप्रतिम जागा निवडली. ते ठिकाण जिथून दोघांचे भावनिक नाते आहे. ते ठिकाण म्हणजे ‘मसाई मारा नॅशनल रिझर्व्ह’. जंगलाच्या मध्यभागी, ते आश्चर्यकारक होते.”

आलियाने हे देखील उघड केले की रणबीरने त्याच्या ट्रॅव्हल गाईडला त्याचे खास क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यास सांगितले, ज्यामुळे मला आणखी आश्चर्य वाटले. आलिया पुढे म्हणाली की, “सर्व काही संपल्यानंतरही मला स्वप्नासारखे वाटले आणि मी खूप भावूक झाले.”

त्या क्षणाची आठवण करून देताना आलिया म्हणाली की, “जेव्हा त्याने (रणबीर) मला फोटोंबद्दल सांगितले तेव्हा मला असे वाटत होते की, ‘तुम्ही फोटो काढण्यात यशस्वी झालात’. कारण त्यांना माहित आहे की फोटोंचा माझ्यासाठी किती अर्थ आहे. मग मी ते फोटो पाहिले, ते खूप खास होते.” अशाप्रकारे तिने अनेक घटनांचा खुलासा या शोमध्ये केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

कपूर खानदानाचा ‘तो’ नियम मोडण्यासाठी नीतू यांना लागली होती २६ वर्षे, २१व्या वयात थाटलेला संसार

प्रतिभावान अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तापसी पन्नूच्या ‘या’ भूमिकांनी जिंकलीत प्रेक्षकांची मने

अभिनेत्री करीना कपूरसोबत करण जोहरला जायचय बिग बॉसच्या घरात, म्हणाला ‘कारण ती खूपच…’

हे देखील वाचा