Friday, January 10, 2025
Home बॉलीवूड दीपिका आणि रणवीरने २०१५ मध्येच केला होता साखरपुडा, कॉफी विद करणच्या शोची पहिली झलक समोर

दीपिका आणि रणवीरने २०१५ मध्येच केला होता साखरपुडा, कॉफी विद करणच्या शोची पहिली झलक समोर

करण जोहरच्या (karan johar) ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोचा प्रत्येक सीझन कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. शोचा ८वा सीझन लवकरच ऑन एअर होणार आहे. बातमीनुसार, करणच्या शोचे पहिले पाहुणे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग असतील. शोचा पहिला प्रोमो व्हिडिओ रिलीज झाला आहे. ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर करणच्या शोमध्ये दिसत आहेत. बी-टाऊनच्या या स्टार कपलला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या शोमध्ये दीपिका आणि रणवीर अनेक खास गुपिते उघड करणार आहेत.

‘कॉफी विथ करण सीझन 8’ च्या प्रोमो व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग स्वतःशी संबंधित एक मोठे रहस्य उघड करताना दिसत आहेत. या स्टार कपलने २०१५ मध्ये एंगेजमेंट केली होती. दीपिका-रणवीरने करणच्या शोमध्ये सांगितले की, दोघांनी २०१५ मध्ये गुपचूप एंगेज केले होते.

समोर आलेल्या प्रोमो व्हिडिओमध्ये करण जोहर रणवीर सिंगचे कौतुक करताना दिसत आहे. शोच्या प्रोमोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण ब्लॅक आउटफिटमध्ये दिसत आहेत. त्याचवेळी करण जोहरनेही काळ्या रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. यासोबतच कॉफी विथ करण सीझन 8 चा सेटही ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये ठेवण्यात आला आहे. जेव्हा करण जोहरने दीपिका आणि रणवीरला स्मोकिंग हॉट म्हटले तेव्हा रणवीर सिंगने उत्तर दिले – थँक्स थरकी काका. रणवीरच्या या उत्तरावर करण गप्प बसला.

व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोण सांगत आहे की तिची उत्तम केमिस्ट्री अभिनेता हृतिक रोशनसोबत आहे. जेव्हा करण जोहरने दीपिकाला विचारले की पती रणवीर सिंग व्यतिरिक्त तिची कोणत्या अभिनेत्यासोबत उत्तम केमिस्ट्री आहे. यावर दीपिकाने सांगितले की, तिची हृतिक रोशनसोबतची केमिस्ट्री सर्वोत्कृष्ट आहे, ज्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. दीपिका आणि हृतिकची जोडी ‘फायटर’ चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

ऋतिक रोशनच्या आईच्या वाढदिवशी साडी नेसून सबा आझाद पोहचली त्यांच्या घरी, व्हिडीओ व्हायरल
विशाल ददलानीने इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामुळे प्रभावित झालेल्या मुलांना गाणे केले समर्पित, सोशल मीडियावर गाणे व्हायरल

हे देखील वाचा