Thursday, April 24, 2025
Home टेलिव्हिजन Viral Video : करण जोहर करणार हॉलिवूड पदार्पण, त्याआधी आलिया भट्टला दिला ‘हा’ इशारा

Viral Video : करण जोहर करणार हॉलिवूड पदार्पण, त्याआधी आलिया भट्टला दिला ‘हा’ इशारा

सध्या हिंदी चित्रपट जगतातील अनेक कलाकार त्यांच्या हॉलिवूडमधील डेब्यूमुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. आपल्या दमदार अभिनयाने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री आलिया भट्टही (Alia Bhatt) लवकरच हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंंगली होती. परंतु आलियाच्या आधी चित्रपट निर्माता करण जोहर (Karan Johar) हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे, ज्याचा खुलासा तिने स्वतः केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो.  तो लवकरच ‘कॉफी विथ करण’चा सीझन 7 घेऊन येणार आहे, ज्यामध्ये तो इंडस्ट्रीतील लोकप्रिय सेलिब्रिटींना आमंत्रित करत असतो आणि त्यांना काही वैयक्तिक आयुष्याबद्दल विचारतो. असे प्रश्न विचारणार आहेत, ज्यातून लोक आजपर्यंत अनभिज्ञ होते. पण यावेळचा ‘कॉफी विथ करण’ करणसाठी खूप खास असणार आहे, कारण या शोच्या माध्यमातून तो ‘हॉलीवूड’मध्ये पदार्पण करणार आहे.

‘कॉफी विथ करण’चा होस्ट करण जोहरने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो , “मी खूप भाग्यवान समजत आहे, कारण मी हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. आलिया भट्ट, माझ्यावर जळू नकोस. यूएसए मधील माझे सर्व चाहते HULU वर माझा शो ‘कॉफी विथ करण 7’ पाहू शकतात,” असे म्हणताना दिसत आहे. सध्या करणचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

 

करण जोहरचा चॅट शो ७ जुलैपासून डिस्ने + हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे. त्यामुळे आता या कार्यक्रमाची सर्वांनाच जोरदार उत्सुकता लागली आहे. कॉफी विथ करण हा कार्यक्रम प्रेक्षकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. कार्यक्रमात अनेक सेलिब्रिटी सहभागी होत असतात. ज्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक प्रश्न त्यांना विचारले जातात. दरम्यान करण जोहरच्या या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा