Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड लग्नाच्या रात्री नेमकं काय झालं? कॅटरिनाने करण जोहरच्या कार्यक्रमात केला धक्कादायक खुलासा

लग्नाच्या रात्री नेमकं काय झालं? कॅटरिनाने करण जोहरच्या कार्यक्रमात केला धक्कादायक खुलासा

कॉफी विथ करणच्या पुढच्या एपिसोडमध्ये कॅटरिना कैफसोबत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी दिसणार आहेत. या शोमध्ये आतापर्यंत फक्त 2 स्टार्स दिसले आहेत, मात्र या तिघांची जोडी पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. कॅटरिनाचा पती विकी कौशल या शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत यापूर्वीच दिसला आहे आणि त्यांनी त्यांच्या लग्नाची अनेक गुपिते उघड केली होती, पण आता कॅटरिना कैफ या कार्यक्रमात झळकणार आहे. कॅटरिना येथे तिच्या हनीमूनवर बोलताना दिसणार आहे.

नुकतेच आलिया-रणबीर आणि कॅटरिना -विकी यांचे लग्न झाले. अशा परिस्थितीत करण जोहरच्या शोमध्ये लग्नाच्या चर्चेसोबतच ‘सुहागरात’सारख्या विषयावरही जोरदार चर्चा रंगली आहे. आलिया भट्टने करणच्या शोमध्ये ‘सुहागरात’ ही संकल्पना मिथक म्हणून फेटाळून लावली, तर कतरिना कैफने ‘सुहागरा’ऐवजी ‘सुहागदिन’ बोलले. कॅटरिना म्हणते, “नेहमीच हनिमूनला जाणे आवश्यक नसते. तो एक आनंदाचा दिवस देखील असू शकतो.”

कॅटरिनाच्या आधी आलिया भट्ट तिचा सहकलाकार रणवीर सिंगसोबतशोमध्ये आली होती आणि करण जोहरच्या प्रश्नावर बोलताना ती म्हणाली, “सुहागरात खोटं आहे, असं काही होत नाही.” तर रणवीर सिंगचं मत वेगळं होतं. आपले म्हणणे मांडले. आता कॅटरिना कैफही तिच्या लग्नाच्या या प्रकरणावर बोलताना दिसणार आहे. या शोच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि ईशान खट्टरही खूप मस्ती करताना दिसत आहेत. करणने सिद्धांतला त्याच्या सिंगल असण्याबद्दल प्रश्न केला, ज्यावर तो म्हणतो, ‘मी इतका सिंगल आहे की माझ्यासोबत राहत असताना तो इशान सिंगल झाला आहे.

हेही वाचा – भाईजानच्या चाहत्यांसाठी खुशखबर! सलमान खानच्या चित्रपटाचा टिझर लाॅंच, अभिनेताच्या स्वॅगवर चाहते फिदा
रिलीजच्या आधीच आला ‘ब्रह्मास्त्र’चा बीटीएस व्हिडिओ, तलवारबाजी करताना दिसले अमिताभ बच्चन
बॉलिवूडच्या क्यूट कपलची बॉक्स ऑफिसवर टक्कर, एकाच दिवशी प्रदर्शित होणार आलिया रणबीरचे ‘हे’ चित्रपट

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा