Thursday, July 18, 2024

रिलीजच्या आधीच आला ‘ब्रह्मास्त्र’चा बीटीएस व्हिडिओ, तलवारबाजी करताना दिसले अमिताभ बच्चन

सिनेमासृष्टीत सर्वात लाेकप्रिय असलेली जाेडी म्हणजेच रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt)  यांचा मोस्ट अवेटेड सिनेमा ‘ब्रह्मास्त्र’ लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे. या चित्रपटाच प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट रिलीज व्हायला केवळ पाच दिवस बाकी आहेत. अशातच निर्माते आणि कलाकार चित्रपटाचे प्रमाेशन करण्यासाठी काेणतीच कमकरता साेडत नाही आहे. नुकताच मेकर्सने चित्रपटाचा बिहाइंड द सीन व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सर्व कलाकार आश्चर्यदायक स्टंट करताना दिसत आहे. 

या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. हेच कारण आहे की, रिलीजच्या पाच दिवस पहिले बिहाइंड द सीन हा व्हिडिओ चाहत्यांसाेबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूर(Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट(Alia Bhatt) स्टंट करताना दिसत आहे. तसेच यात हैराण करणारीबाब म्हणजे अमिताभ बच्चन देखील तलवारबाजी करताना दिसत आहे.

चित्रपटाच्या रिलीजची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतशी बहिष्कारची मागणी वाढत आहे. सोशल मीडियावर बायकॉट ट्रेंड चालू असल्याने मेकर्सची चिंता अधिक वाढली आहे. बायकॉट ट्रेंडमुळे काही दिवसापूर्वी आमिर खानचा आलेला लाल सिंह चड्ढा चित्रपटाचे माेठे नुकसान झाले. त्यामुळे या चित्रपटाला माेठ्या प्रमाणात फटका सहन करावा लागला.

आश्चर्यची बाब म्हणजे या चित्रपटात पाण्यासारखा पैसा लावण्यात आला. सर्वाधिक खर्च चित्रपटाच्या वीएफएक्सवर करण्यात आला हाेता. जे या मेकिंग व्हिडीओमध्ये बघायला मिळत. याव्यतिरिक्त ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या कलाकरानेही चित्रपटाकरीता चांगलच मानधान घेतल आहे.

मिडीया रिपोर्टनुसार, रणबीरने या चित्रपटासाठी 25-30 करोड़ रुपये मानधान घेतल तर आलियाने 10-11 करोड़ रुपए मानधान घेतल. तेच महानायक अमिताभ बच्चन आणि साउथ सुपरस्टार नागार्जुन विषयी बाेलायच झाल तर अमिताभने या चित्रपटासाठी 10 करोड़ रुपये घेतले अन् नागार्जुनने 11 करोड़ रुपयाच मानधान.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘आपण त्यांच्यासाठी काहीही करु शकतो…’ मराठी दिग्दर्शक विजू माने यांनी मुख्यमंत्र्यांचे केले तोंडभरुन कौतुकदुर्दैवी! राज कपूरांनी ज्या मित्रासाठी 1 रुपयात साईन केला सिनेमा, फ्लॉप झाल्यानंतर त्यानेच सोडले होते जग‘मी मुले दत्तक घेऊ शकतो नाहीतर…’ नंदिता मेहतानीसोबत लग्न ठरल्यानंतर विद्युत जामवालने केला मोठा खुलासा

हे देखील वाचा