बॉलिवूडचे भाईजान अर्थातच सलमान खान (salman khan)हा नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये त्याचा खूप दरारा आहे तो सध्या त्याच्या येणऱ्या ‘कभी भाई कभी जान’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याने या चित्रपटातला पहिला लुक सोशल मीडियावर शेअर केला होता तेव्हा तो चांगलाच चर्चेत आला होता, आणि आता त्याच्या ‘कभी भाई कभी जान’ टिझर (5 सप्टेंबर ) आज प्रदर्शित झाल आहे. जाणून घेउया पुर्ण माहिती
‘कभी भाई कभी जान’ चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टिझरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये सलमानचा लुक खूपच पसंद केला जात आहे, याच्या आधी त्याचा असा लुक कधीच पाहीला नसेल. या व्हिडाओमध्ये सलमानचा स्वैगच वेगळा दिसत आहे आणि तोच स्वैग प्रेक्षकांना भुरळ पाडत आहे.
अभिनेता सलमान खान याला इंडस्ट्रीमध्ये येउन 34 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात त्याने ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची घोषना केली होती. तेव्हा त्याने आपल्या लुकची पहिली झलक दाखवली होती. यानंतर 10 दिवसांनी सलमानने आपल्या अधिकारिक अकाउंटवर एक टिझर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये सलमान बाइकवर राइड घेत लडाखमध्ये फिरत आहे. यामध्ये सलमान एकदम बदलेला दिसत आहे लांब केस आणि डोळ्यावर चश्मा लावलेला दिसत आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओला सलमान खानने आपल्या इंन्स्टग्राम अकाउटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सलमान एकटाच सुनसान रस्त्यावर बाइक चालवताना दिसत आहे आणि आजूबाजूने गोळ्यांचा आवाज येत आहे. सध्या इंटरनेटवर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे आणि खूपच धमाल करत आहे. सलमान खानचा नविन लुक चाहत्यांना भुरळ पाडत आहे. या चित्रपटामध्ये सलमानची आवडची शेहनाज गिल या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पन करणार आहे.
या चित्रपटामध्ये शेहनाज गिलसोबत (shehnaaz gill) आणखी कलाकार पुजा हेगडे, दग्गुबाती वेंकटेश, जस्सी गिल, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल आणि विनाली भटनागर ही पहायला मिळणार आहेत. आधी या चित्रपटाचे नाव कभी ईद कभी दिवली असे होते मग यानंतर नाव बदलून कभी भाई कभी जान असे नाव ठेवले आहे. सध्या बॉलिवूडची हालत पाहून सलमान खानचा चित्रपट किती चालेल हे बघने फारच रोमांचक असणार आहे.
हेही वाचा
शाहरुख खान ते माधुरी दीक्षितपर्यंत, जाणून घ्या खऱ्या आयुष्यात कोण आहेत बॉलिवूड स्टार्सचे गुरू
या वयातही अमिताभ बच्चन बनले ‘म्युजिक कंपोजर’!, ‘या’ चित्रपटामध्ये मिळाले काम