Saturday, March 28, 2026
Home मराठी ‘कोण होणार करोडपती’चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सहभागासाठी ‘अशी’ करा नावनोंदणी

‘कोण होणार करोडपती’चा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, सहभागासाठी ‘अशी’ करा नावनोंदणी

बुद्धी आणि ज्ञानाच्या जोरावर पैसे जिंकण्याची संधी देणारा कोण होणार करोडपतीचा नवीन सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

करोडपती होण्याचे स्वप्न प्रत्येकजण पाहतो. परंतू, सर्वसामान्यांचे हे स्वप्न सत्यात उतरण्याची संधी ‘सोनी मराठी’ ही वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. स्वबळावर आणि ज्ञानावर मिळणाऱ्या यशाची चव चाखण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज व्हा. कारण लवकरच ‘कोण होणार करोडपती’चा पुढचा सीझन येत आहे.

‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सीझनमध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया आता सुरु झाली आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी रियॅलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. मनोरंजनासोबत ज्ञानार्जन हे वैशिष्ट्य असणार्‍या या कार्यक्रमात स्वत:ला अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं, याची प्रचिती मागील दोन सीझनमुळे सगळ्यांना आली.

यंदाही कोण होणार करोडपती या कार्यक्रमाचे प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) सूत्रसंचालन करणार आहेत. स्वतःचा अभिनय कौशल्याबरोबरच सचिन खेडेकर सहभागींसोबत प्रेमळ संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचे काम मोठ्या खुबीने करतात.

मागच्या वर्षी सहभागी होण्यासाठी स्पर्धकांना १० प्रश्न विचारले जात होते. पण यंदा १४ दिवस १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. जितके जास्त प्रश्न तितक्याच जास्त संधी.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. २३ फेब्रुवारीपासून सुरु झालेले हे प्रश्न, ८ मार्च पर्यंत विचारण्यात येणार असून

७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन किंवा सोनी लिव्ह अँपवर जाऊन प्रेक्षक स्वतःची नोंदणी करून घेऊ शकतात.

हेही वाचा – 

हे देखील वाचा