Wednesday, July 3, 2024

तुम्ही जेवता तेव्हा तुमची आई असंच करते का? प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने व्हिडिओत सांगितलंय कारण

क्रांती रेडकर (Kranti Redkar) मराठी मनोरंजनविश्वातील आघाडीची अभिनेत्री. सध्या क्रांती चित्रपटांमध्ये काम कमी आणि ऑफ कॅमेरा जास्त काम करताना दिसत आहे. याशिवाय मधल्या काळात आर्यन खान ड्रग्स केसच्या दरम्यान देखील क्रांती आणि तिचे पती असलेले समीर वानखेडे मीडियामध्ये खूपच गाजले. नाके आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या. त्यानंतर काही काळाने हे प्रकारण शांत तर झाले. मग क्रांती मीडियामधून गायबच झाली जणू. यादरम्यान ती सोशल मीडियावर सक्रिय होती. मात्र नुकताच क्रांतीने तिचा एक हटके आणि लक्षवेधी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रांतीने आईचे प्रेम एका वेगळ्याच पद्धतीने व्यक्त केले आहे.

या व्हिडिओमध्ये क्रांतीने तिची आई ती जेवायला बसली असताना कशी करते याचा एक उत्कृष्ट नमुना व्हिडिओमध्ये दाखवला आहे. या व्हिडिओमध्ये क्रांती म्हणते, “बर तुम्ही जेवायला बसल्यावर तुमची आई समोर बसली की, तुम्हाला तुमच्या समोर जासूस ठेवला आहे असे वाटते का? मला वाटते अगदी ००७ स्टाइलमध्ये जेम्स बॉन्ड. कायम माझ्या जेवणावर, माझ्या ताटावर तिची नजर असते. अँटी घे अजून, ओत ओत, ती बघ सगळी मसूर तळाला आहे. बोंबलाचा तुकडा उचल त्या खाली तीन कोलंब्या आहेत. नीट मीठ चोळ, लिंबू पीळ. भात तसाच दिसतो मला. थोडा रस्सा वाढव, त्यात थोडी भाजी मिक्स कर. हा पापड का नाही खाल्ला चरबी. लोणचे तिकडेच आहे. मग सांगतेस का वाढायला? या रस्याच्या वाटीला हातच नाही लावला. आता तू सांग मला जेवण करायला? जेवत असताना सारखा दबाव, प्रेशर, टेन्शन. मात्र तिचे ते प्रेम आहे.”

क्रांतीचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून, त्यावर वेगवेगळ्या कमेंट्स देखील येत आहे. या कमेंट्समधून अनेक नेटकरी त्यांचे असेच काही अनुभव देखील शेअर करताना दिसत आहे. क्रांती लवकरच ‘रेनबो’ या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून, याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. ‘प्लॅनेट मराठी’ चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर व ‘मँगोरेंज’ प्रॉडक्शनच्या ह्रिदया बॅनर्जी यांनी ‘रेनबो’ चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘रेनबो’ या चित्रपटात प्रसाद ओक, उर्मिला कोठारे, सोनाली कुलकर्णी आणि ऋषी सक्सेना ही मंडळी आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा