बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन या दिवसात तिचा आगामी चित्रपट ‘मिमी’मुळे खूप चर्चेत आहे. सध्या सर्वत्र तिच्या या चित्रपटाची चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या पोस्टर तसेच ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. क्रिती सेनन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचे अपडेट वेळोवेळी देत असते. अशातच तिच्या या चित्रपटातील एका गाण्याचे दर्शन तिने सोशल मीडियावर दिले आहे.
क्रिती सेनन तिच्या ‘मिमी’ या चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्याचा काही भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यामध्ये ती जोरदार ठुमके लावताना दिसत आहे. तिच्यासोबत सई ताम्हणकर देखील दिसत आहे. तसेच हे पूर्ण गाणे प्रदर्शित झाले आहे, याची देखील तिने माहिती दिली आहे. तिचे हे गाणे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडले आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Kriti senon share her first song param sundari of her mimi movie on social media)
काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये एका सरोगसी मातेची कहाणी दाखवली. ती भूमिका क्रिती सेनन निभावत आहे. एका अमेरिकन जोडप्याला बाळ पाहिजे असल्याने ते बाळ क्रितीच्या गर्भात वाढवण्यासाठी ते तिला विनंती करतात. तसेच त्यासाठी ते तिला 20 लाख रुपये देणार आहेत असे सांगतात. यावर ती तयार होते. पण नंतर त्यांना हे बाळ नको असते. त्यामुळे ते जोडपं तिला गर्भपात करण्यास सांगतात. यादरम्यान तिची होणारी मानसिक आणि शारीरिक अवहेलना या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.
‘मिमी’ चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग मागच्या वर्षी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट महिला केंद्रित असणार आहे. यामध्ये सरोगेट आईची कहाणी दाखवली जाणार आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट 30 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’