अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल राशिद खान(Kamaal Rashid Khan) हा सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर मत मांडत असतो. तो फक्त बॉलिवूड कलाकारांनाच ट्रोल करत नाही, तर इतर क्षेत्रातील व्यक्तींवरही टीका करत असतो. नुकतेच त्याला त्याच्या वादग्रस्त ट्विट केल्यामुळे तुरुंगात ही जावे लागले होते. अशातच केआरकेने नवं ट्विट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. यावेळी त्याने ट्विट करत बॉलिवूडचा भाईजानची माफी मागितली आहे. त्यामुळे केआरकेचं हे नवं ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे.
नेहमीच सलमानबद्दल वादग्रस्त विधान काढणाऱ्या केआरकेने ट्विट करून त्याची माफी मागितली असून त्याला तुरुंगात पाठवण्यात सलमान खानचा कोणताही हात नसल्याचे म्हटलं आहे. केआरकेने ट्वीट करुन लिहिलं की, ‘मी मीडियाच्या सर्व लोकांना सांगू इच्छितो की माझ्या अटकेमागे सलमान खानचा हात नव्हता. दुसरा कोणीतरी मागून खेळून गेला. भाईजान सलमान खान तुमच्याविषयी गैरसमज झाल्याबद्दल मला माफ करा. मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुखावले असल्यास मी माफी मागतो. आणि मी ठरवले आहे की यापुढे तुमच्या चित्रपटांचे पुनरावलोकन करणार नाही.’
I want to inform all media ppl that #SalmanKhan was not behind my arrest as I thought. Peeche Se Koi Aur Khel Kar Gaya. Bhai jaan @BeingSalmanKhan I am really sorry for misunderstanding you. And I apologise if I did hurt you in anyway. I voluntarily decide to not review ur films.
— KRK (@kamaalrkhan) October 30, 2022
केआरकेने करण जोहरसाठी ‘हे’ सांगितले
इतकेच नाही तर केआरकेनं पोस्टमध्ये असेही लिहिले की, अजूनही अनेक लोकांना वाटते की माझ्या अटकेमागे करण जोहरचा हात होता. मी पुन्हा सांगतो की माझ्या अटकेशी करण जोहरचा काहीही संबंध नाही.
केआरकेने सलमान खानबद्दल हे ट्विट का केले?
काही दिवसांपूर्वी केआरकेने ट्विटरवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने करण जोहर, शाहरुख खान, आमिर खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार यांचे नाव घेत या अभिनेत्यांचा माझ्या अटकेशी काहीही संबंध नसल्याचे सांगितलं होत. ही पोस्ट पाहून लोक केआरकेच्या या अटकेशी सलमान खानचा काही संबंध आहे का असा प्रश्न उपस्थितीत करु लागले.
सलमान खान आणि केआरकेचे वाद
केआरकेने सलमान खानसोबत अनेकदा पंगा घेतला आहे. राधे चित्रपटाच्या रिलीजच्या वेळीही त्यांनी भाईजानशी खोटे बोलले होते. राधेची नकारात्मक समीक्षा करताना त्यांनी सलमान खानवर अनेक वैयक्तिक आरोप केले. त्यानंतर सलमान खानच्या टीमने केआरकेवर मानहानीचा दावा दाखल केला होता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘वयाच्या 12 व्या वर्षापासून करतेय बॉडी शेमिंगचा सामना’, अभिनेत्री केला मोठा खुलासा
शरीराच्या ‘या’ आजारामुळे डिप्रेशनमध्ये गेली होती इलियाना डिक्रूझ, आत्महत्येचाही करायची सतत विचार