Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘अभिनेत्रीशी लग्न केल्याचा परिणाम’, विराटच्या डिप्रेशनवर केआरकेचे धक्कादायक वक्तव्य; ट्वीटही केले डिलीट

अभिनेता आणि चित्रपट निर्माता कमाल राशिद खान हा सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावर मत मांडत असतो. तो फक्त बॉलिवूड कलाकारांनाच ट्रोल करत नाही, तर इतर क्षेत्रातील व्यक्तींवरही टीका करत असतो. यावेळी त्याने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याच्यावर निशाणा साधला. भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी (दि. 28 ऑगस्ट) महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यापूर्वी त्याने विराटवर निशाणा साधत अभिनेत्री अनुष्का शर्मा हिलादेखील ट्रोल केले. तसेच, संघात विराटच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित केले.

कमाल राशिद खान (Kamaal Rashid Khan) याने अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यावर ट्वीटद्वारे टीकास्त्र सोडले होते. खरं तर, एका मुलाखतीदरम्यान विराटने तो नैराश्येत असल्याचे सांगितले होते. आता यावर ट्वीट करत केआरकेने लिहिले की, “विराट कोहली भारताचा पहिला असा क्रिकेटपटू आहे, ज्याला नैराश्येची समस्या आहे. एका अभिनेत्रीशी लग्न केल्याचा हा परिणाम आहे. अनुष्काने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, विराटला नैराश्येची समस्या आहे.” या ट्वीट नंतर त्याला जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर त्याने हे ट्वीट डिलीट केले. मात्र, त्याच्या ट्वीटचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत.

KRK-On-Virat-Kohli
Photo Courtesy : Twitter/kamaalrkhan

तो इथेच थांबला नाही, तर त्याने पुढे आणखी एक ट्वीट केले आणि लिहिले की, “एका उत्तर भारतीय मजबूत विराट कोहलीला नैराश्येचा आजार कसा झाला?”

निवडकर्त्यांवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
यानंतर त्याने पुन्हा एक ट्वीट केले आणि संघ निवडकर्त्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केआरकेने लिहिले की, “मला समजत नाही की, जेव्हा विराट कोहलीने स्वत: सांगितले की, तो नैराश्येचा बळी आहे, मग आशिया कप 2022 मध्ये निवडकर्त्यांनाही नैराश्याची समस्या आहे का?.”

त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काही युजर्स नाराजी व्यक्त करत आहेत, तर काहीजण त्याची खिल्ली उडवत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘मला कशाचीही पर्वा नाही…’, 24 वर्षांचा संसार मोडत स्पष्टच बोलली सोहेल खानची एक्स पत्नी
सुनिल शेट्टीच्या प्रसिद्ध गाण्यावर ‘या’ व्यक्तीने ट्रेडमिलवर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ आला समोर
निया शर्माच्या बोल्डनेसचा जलवा! अवघ्या 30 सेकंदाच्या व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

हे देखील वाचा