स्वयंघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता असलेला कमाल आर खान उर्फ केआरके सगळ्यांना माहीतच असेल. नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि वादांमुळे चर्चेत असणारा केआरके सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय आहे. आपल्या ट्विटच्या माध्यमातून तो नेहमीच देशातील राजकीय, सामाजिक, मनोरंजन, खेळ आदी सर्वच क्षेत्रांवर भाष्य करत असतो. त्याच्या ट्विटमुळे तो अनेकदा विवादांमध्ये देखील सापडला असला तरी तो त्याचे ट्विट करणे काही थांबवत नाही. आत केआरकेने नुकतेच सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक यांच्यावर निशाणा साधला आहे.
झाले असे की, काही दिवसांपूर्वी सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी यांना एकत्र स्पॉट केले गेले. त्यानंतर मीडियामध्ये या दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांवर तुफान अफवा येत आहे. सोशल मीडियावर नेटकरी देखील ते डेट करत आहे का? असे प्रश्न विचारत आहे. या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात इब्राहिम आणि पलक यांना एकाच गाडीत जाताना पहिले गेले. तेव्हा पलकने मीडियाला पाहून तिचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न देखील केला, मात्र त्यात ती यशस्वी झाली नाही. या व्हिडिओच्या व्हायरल झाल्यानंतर या दोघांबद्दल सतत प्रश्न उपस्थित होत आहे.
यातच कमाल आर खानने देखील या दोघांच्या डेटिंगच्या बातम्यांवर त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने त्याच्या ट्विटच्या माध्यमातून सैफ अली खानच्या मुलावर इब्राहिमवर निशाणा साधला आहे. कमालने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “इब्राहिम खान हा पलक तिवारीसोबत डेटवर गेला. कुठे पलक आणि कुठे इब्राहिम. मुलगा एकदम सैफ अली खानवर गेला आहे. ” कमाल आर खान अनेकदा बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधताना दिसतो आणि त्यांच्यावर ट्विट देखील करत असतो. यामुळे तो अनेकदा संकटात देखील अडकला आहे, मात्र त्याला त्याचा काहीही फरक पडत नाही.
तत्पूर्वी इब्राहिम अली खान आणि पलक तिवारी यांच्याकडून त्यांच्याबद्दल येणाऱ्या या बातम्यांवर किंवा अफवांवर कोणतेही अधिकृत उत्तर आले नाही.
हेही वाचा :
- Happy Birthday: अभिनेता म्हणून केली करिअरची सुरुवात, पण दिग्दर्शक म्हणून सुभाष घईंनी दिले सुपरडूपर हिट चित्रपट
- फाल्गुनी पाठकच्या गाण्याने मिळाली ओळख, पण एमएमएस लीक झाल्यावर चांगलीच वादात सापडली होती रिया सेन
- जेव्हा रूममध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगे हाथ पडकली गेली होती प्रियांका चोप्रा, लालबुंद झालेल्या मावशीने केलं ‘हे’ काम