Thursday, November 21, 2024
Home बॉलीवूड ‘या’ अभिनेत्रीसाठी कुमार गौरवने दिला होता राज कपूर यांच्या मुलीला लग्नासाठी नकार

‘या’ अभिनेत्रीसाठी कुमार गौरवने दिला होता राज कपूर यांच्या मुलीला लग्नासाठी नकार

‘लव्ह स्टोरी’ या चित्रपटाने कुमार गौरव अगदी कमी वेळात स्टार बनला. बॉलिवूडमध्ये ‘जुबली कुमार’ या नावाने प्रसिद्ध असलेले राजेंद्र कुमार (rajendra kumar) यांचा तो मुलगा आहे. कुमार गौरवने 1981 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह स्टोरी’ या सिनेमातुन पदार्पण केलं. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री विजेता पंडित ही देखील होती. या चित्रपटाची निर्मिती त्यांचे वडील राजेंद्र कुमार यांनी केली होती. या सिनेमामुळे कुमार गौरवला बॉलिवूडमध्ये ‘लव्हर बॉय’ असे म्हटले जाऊ लागले होते.

का दिला राज कपूर यांच्या मुलीला नकार?
या चित्रपटाच्या यशानंतर बॉलिवूडचे शो मॅन राज कपूर (Raj Kapoor) यांनी त्याला आपली मुलगी रीमा (Reema) हीच्यासाठी पसंत केले होते. राजेंद्र कुमार (Rajendra Kumar) आणि राज कपूर चांगले मित्र होते आणि दोघांनाही त्यांच्या मैत्रीचे रूपांतर नात्यात करायचे होते. मात्र, लव्हस्टोरी (Love Story) या चित्रपटात काम करत असताना कुमार गौरव (Kumar Gaurav) अभिनेत्री विजेता पंडितच्या (Vijeta Pandit) प्रेमात पडला आणि त्याने रीमासोबत लग्न करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने त्याचे वडील राजेंद्र कुमार यांनी त्याला विजेताशीही लग्न करू दिले नाही. विजेता पासून वेगळे झाल्यानंतर कुमार गौरव याने 1984 मध्ये नम्रता दत्तसोबत (Namrata Dutt) लग्न केले. नम्रता दत्त ही अभिनेता आणि राजकारणी सुनील दत्त (Sunil Dutt) यांची मुलगी आहे. नम्रताची बहीण प्रिया दत्त (Priya Dutt ) संसदेचा भाग होती आणि भाऊ संजय दत्त (Sanjay Dutt) बॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. कुमार गौरव आणि नम्रता यांना दोन मुली आहेत.

निर्माते-दिग्दर्शकांचा लाडका कुमार गौरव
लव्ह स्टोरी या सिनेमा नंतर कुमार गौरवने 1982 मध्ये रिलीज झालेल्या ‘तेरी कसम’ या चित्रपटात काम केले होते. हा चित्रपटही हिट झाला होता. यानंतर चॉकलेट हिरो म्हणून तो बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शकांचा लाडका बनला. यादरम्यान त्याने अनेक चित्रपट साइन केले, मात्र ‘तीसरी कसम’ नंतर त्याचे ‘स्टार’, ‘रोमान्स’, ‘लवर’, ‘हम हैं लजावाब’ आणि ‘ऑल राऊंडर’ असे बरेच सिनेने फ्लॉप गेले.

कुमार गौरवचे हीट सिनेमे
‘लव्ह स्टोरी’ आणि ‘तेरी कसम’ या सिनेमांमुळे कुमार गौरवची कारकीर्द जितकी झपाट्याने वर गेली होती तितक्याच वेगाने खाली आली. प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा, सुनील दत्त यांचा जावई आणि संजय दत्तचा मेहुणा असुनही तो यशस्वी होऊ शकला नाही. नंतर तो ‘नाम’ या चित्रपटात दिसला हा चित्रपट हिट झाला. मात्र त्याच्या यशाचे श्रेय हे संजय दत्तला देण्यात आले.

हॉलिवूडमध्ये काम करूणही अयशस्वी का?
कुमार गौरव 1999 साली काही टेलिव्हिजन शोमध्ये दिसला होता. सन् 2000 मध्ये त्यानी ‘गँग’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले. सन् 2002मध्ये तो ‘कांटे’ आणि2004 मध्ये हॉलिवूड चित्रपट ‘गियाना 1838’ आणि 2009 मध्ये ‘माय डॅडी स्ट्राँगेस्ट’ या कॉमेडी चित्रपटात दिसला. कुमार गौरवने आता चित्रपटात काम करने सोडले आहे आणि तो एक यशस्वी व्यावसायिक झाला आहे. (kumar gaurav broke engagement with raj kapoor daughter rima kapoor know more)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
बाबा सिद्दीकीच्या पार्टीत पलकच्या रिव्हिलिंग ड्रेसवर संतापले नेटकरी; म्हणाले, “तु इफ्तारसाठी आली की आयटम साँगसाठी?”

हेमा मालिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावले होते अभिनेते संजीव कुमार यांना वेड

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा