Wednesday, July 3, 2024

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रीवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीला गमावल्यानंतर हळहळली

टीव्ही शो ‘कुमकुम भाग्या’ मध्ये रियाची भूमिका साकारणारी प्रसिद्ध अभिनेत्री पुजा बॅनर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. पुजा व्यवासायिक आयुष्यासाेबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट चाहत्यांसाेबत शेअर करत असते. मात्र, यावळी पुजाने एक अतिशय दु:खद बातमी सांगितली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम पाेस्टद्वारे तिच्या वडीलांचे निधन झाल्याचे सांगितले. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर वडिलांची आठवण करून एक भावनिक पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री पुजा (pooja banerjee) हिने 4 डिसेंबर रोजी आपल्या अधिकृत इन्स्टाग्रामवर वडिलांच्या फाेटाेसह एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्रीने लिहिले की, “बाबा तुमच्या आत्माला शांती मिळावी. मला माहित आहे की. तुम्ही आता एका चांगल्या ठिकाणी आहात. ओम शांती … तुमची खुप आठवन येईल संदीप, साना, पूजा, नील आणि आकाश.” हे पोस्ट सोशल मीडियावर पाहून, चाहत्यांसह अनेक कलाकारांनी तिच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja Banerjii (@poojabanerjeee)

पुजा बर्‍याच काळापासून टीव्ही जगापासून दूर आहे. माध्यमातील वृत्तानुसार, तिने प्रेग्नेंसीमुळे मधातच हा शाे सोडला. अलीकडेच पूजाने एका मुलीला जन्म दिला आहे. आपल्या लेकीमुळे ती टीव्ही जगापासून दूर आहे. पूजा बॅनर्जी अखेरच्या ‘कुमकुम भाग्या’ या प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये दिसली हाेती. या मालिकेत अभिनेत्रीने नकारात्मक भूमिकांमधून बरीच लोकप्रियता मिळविली आहे.

पुजाच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर अभिनेत्रीने तिच्या कारकीर्दीची सुरुवात एमटीव्हीच्या ‘रोडीज’मधून केली हाेती. यानंतर तिला ‘एक दूसरे से करते हैं प्यार हम’ या मालिकेतून पहिला ब्रेक मिळाला, जाे तिच्या करिअरसाठी टर्निंग पाॅईंट ठरला. यानंतर पुजा ‘कसौटी जिंदगी की’, ‘कुमकुम भाग्या’ , ‘चंद्रकांत’, ‘चंद्र नंदिनी’, ‘दिल ही ताे है’ सारख्या अनेक लाेकप्रिय मालिकांमध्ये दिसली. तिने ‘कहने को हमसफर हैं’ यातून ओटीटीमध्ये पदार्पण केले. (kumkum bhagya tv show actress pooja banerjee father dies pooja shares emotional post on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
हाफ चायनिज! कान्या वेस्टने एलन मस्कवर व्यक्त केला संताप
आणखी काय हवं! दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगसाठी मोडला ‘हा’ नियम

हे देखील वाचा