बाॅलिवूडचा लाेकप्रिय अभिनेता रणवीर सिंग याचा ‘सर्कस’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर लाँचच्या वेळी रणवीर सिंगसोबत त्याची पत्नी दीपिका पदुकोण हिनेही जबरदस्त डान्स केला. रोहिल शेट्टी दिग्दर्शित सर्कस या चित्रपटात दीपिका पदुकोण एक छोटीशी भूमिका साकारताना दिसत आहे.
दीपिका (deepika padukone) हिने आपल्या पतीच्या सर्कस या चित्रपटासाठी स्वतःचा नियम मोडला आहे. काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दीपिका पदुकोण म्हणाली होती की, ती कॅमिओ करत नाही. मात्र, दीपिका रणवीर सिंग (ranveer singh) याच्या चित्रपटात कॅमिओ करताना दिसत आहे.
वास्तविक, 2014 मध्ये दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर याचा ‘फाइंडिंग फॅनी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका पदुकोणला विचारण्यात आले की, ती रणवीर सिंगच्या आगामी चित्रपट दिल धडकने दोमध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे का? याला उत्तर देताना दीपिका पदुकोण म्हणाली की, “ती कॅमिओ करत नाही.”
मात्र, आता दीपिका पदुकोण रणवीर कपूर आणि जॅकलिन फर्नांडिसच्या ‘सर्कस’ या चित्रपटामध्ये कॅमिओ करताना दिसत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकाेण व्यतिरिक्त संजय मिश्रा, ब्रिजेंद्र काला, पूजा हेगडे, वरुण शर्मा यांच्यासह अनेक मोठे स्टार्स महत्वाच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट 23 डिसेंबरला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच चांगलाच चर्चेत आहे. रोहित शेट्टीचा हा चित्रपट मल्टिस्टारर असून तो गोलमालची झलक देत आहे.
दीपिका पदुकाेणच्या वर्कफ्रंटबद्दल बाेलायचे झाले, तर दीपिका पदुकोण सध्या ‘पठाण’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यासोबतच दीपिका पदुकोणही प्रभाससोबत आगामी चित्रपटात दिसणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, दीपिका पदुकोणचीही ‘जवान’ या चित्रपटासाठी निवड झाली आहे. (bollywood actress deepika padukone broke the rule for husband ranveer singh herself had said about cameo now added temper)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘जेद्दा’मध्ये अक्षय कुमारला भेटला जबरा फॅन, आवडत्या अभिनेत्याची गाडी थांबवून केले ‘हे’ काम
शाॅकिंग! आयुष्यमान खुरानाने केला माेठा खुलासा; म्हणाला, ‘मला चप्पलीनं मारत…’