कुणाल तिवारी आणि काजल यादव यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘रोटी’ या भोजपुरी चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा चित्रपट एका गरीब कुटुंबावर आधारित आहे. यात चित्रपटात असलेल्या गरीब जोडप्याला आपल्या मुलांची भूक भागविण्यासाठी पोटभर भाकरीची आस असते. अतिशय भावनिक आणि काळजाला भिडणाऱ्या विषयावर सिनेमा भाष्य करतो. ‘रोटी’ या भोजपुरी चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असून, आतापर्यंत हा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास ८० हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. या चित्रपटात अभिनेता कुणाल तिवारी आणि अभिनेत्री काजल यादव हे दोघे पती-पत्नीच्या भूमिका साकारत असून, जे रोटीसाठी संघर्ष करताना दिसत आहे. ग्रामीण भागात घडणारी ‘रोटी’ चित्रपटाची कथा डोळ्यात पाणी आणणारी आहे. या चित्रपटात गरीब वातावरणात राहणारी मुले प्रत्येक तुकड्यासाठी तळमळत असल्याचे दाखविण्यात आले आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये असे काही मुद्दे दाखविण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना विचार करायला भाग पडतात.
वर्ल्डवाईड रेकॉर्डसचे एमडी रत्नाकर कुमार यांनी सांगितले की, “ट्रेलर फार विलक्षण आहे. यामध्ये कुणाल तिवारी आणि काजल यादवसोबत सोनालिका प्रसादची व्यक्तिरेखा खूपच आव्हानात्मक आहे. ट्रेलरसोबतच चित्रपटाची गाणी सुद्धा उत्तम आहेत, ज्यावर लोकांकडून सकारत्मक प्रतिक्रिया येत आहेत.” चित्रपटाचे दिग्दर्शक धीरेंद्र कुमार झा म्हणले की, “भोजपुरी भाषिक लोक आणि चित्रपट जगतासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आपण आपल्या इंडस्ट्रीमध्ये चित्रपटांचा ग्राफ वाढवला जरी असला तरी राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय सन्मानाविषयी आपण काहीसे अपूर्ण आहोत. असे सन्मान नेहमी चांगले चित्रपट करण्याची प्रेरणा देतात.”
या चित्रपटातला मुख्य अभिनेता कुणाल तिवारी म्हणाला की, “मनोरंजनाच विचार करून आम्ही ‘रोटी’ हा उत्तम चित्रपट तयार केला आहे. आशा आहे की, प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल आणि यावर्षी या चित्रपटाला भोजपुरीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळेल. आम्ही यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करत असून, तुम्ही देखील यासाठी प्रार्थना करा.” हा चित्रपट धीरेंद्र कुमार झा यांनी दिग्दर्शित केला असून, गीता तिवारी यांच्या सहकार्याने सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे.
हेही वाचा :










