‘कुंडली भाग्य’ या प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये करण लुथराची भूमिका साकारल्यानंतर घराघरात प्रसिद्ध झालेल्या धीरज धूपरने (Dheeraj Dhoopar) या शोचा निरोप घेतला आहे. त्याने शो सोडल्यानंतर चाहते खूप निराश झाले आहेत. त्याचवेळी आता बातमी आली आहे की, या शोमध्ये एक नवा अभिनेता येणार आहे. हा अभिनेता आता करण लुथराची भूमिका साकारताना दिसणार आहे.
धीरजने निर्मात्यांच्या संमतीने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धीरजला आता काहीतरी नवीन करायचे आहे, म्हणून त्याने ‘कुंडली भाग्य’चा निरोप घेतला. करण लुथराच्या भूमिकेत धीरजची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते आणि अशा परिस्थितीत प्रेक्षक सहजपणे जोडू शकतील अशा चेहऱ्याला शोमध्ये आणणे निर्मात्यांसाठी आव्हान होते. मात्र आता या शोमध्ये शक्ती अरोराची (Shakti Arora) एंट्री होणार आहे. शक्ती याआधी ‘मेरी आशिकी तुम ही हो’ या शोमध्ये दिसला होता. (kundali bhagya actor dheeraj dhoopar quits show shakti arora to play lead role)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरजने शोला अलविदा केल्यानंतर आता निर्माते शोच्या नवीन कथेवर काम करत आहेत. सूत्राने सांगितले की, “धीरजसोबत काम करताना खूप छान वाटले. आता आम्ही आनंदी आहोत की, शक्ती नवीन हिरोच्या रूपात शोमध्ये प्रवेश करत आहे. आम्ही बदलासाठी कथेवर काम करत आहोत.”
दुसरीकडे, धीरज धूपर लवकरच पिता होणार आहे. यापूर्वी त्याने पत्नी विनी अरोरा हिच्यासाठी बेबी शॉवर पार्टी देखील आयोजित केली होती. एका टीव्ही शोदरम्यान दोघांची भेट झाली आणि काही वर्षे डेटिंग केल्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी लग्न केले. त्याच वेळी, आता दोघेही त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत करणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा