Wednesday, December 6, 2023

पहिल्या नजरेतच झालं होतं धीरज धूपरला प्रेम, तरीही ६ वर्षानंतर घेतला लग्नाचा निर्णय

प्रेक्षकांची आवडती मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये, करणची भूमिका साकारणारा धीरज धूपर (Dheeraj Dhoopar) चाहत्यांचा लाडका अभिनेता आहे. यात प्रीता म्हणजेच श्रध्दा आर्यासोबत त्याची जोडी खूप पसंत केली जाते. धीरजच्या अभिनयाचे प्रशंसकही कमी नाहीयेत. पण आज आपल्या अभिनय कौशल्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या धीरज धूपरला आधी अभिनेता व्हायचे नव्हते, हे तुम्हाला माहीत आहे का? सोमवारी (२० डिसेंबर) धीरज धूपर त्याचा ३७वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त या हँडसम हंकबद्दल अशा काही गोष्टी जाणून घेऊया, ज्या तुम्हाला आजपर्यंत माहीत नसतील.

धीरज धूपरने बंगळुरूमध्ये त्याच्या आई-वडिलांसोबत बराच काळ घालवला आहे. त्याला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचे होते, परंतु त्याला वाटले की तो त्याच्या कमी उंचीमुळे मॉडेलिंगमध्ये यशस्वी होऊ शकणार नाही. याच कारणामुळे मॉडेलिंगकडे दुर्लक्ष करून, त्याने अभिनयाच्या दिशेने प्रवास सुरू केला. (happy birthday dheeraj dhoopar read unknown facts about him)

धीरज धूपर हा अभिनेत्याव्यतिरिक्त एक फॅशन डिझायनरही आहेत. तसेच त्याला जॅकेट्सची खूप आवड आहे आणि तो स्वतःची जॅकेट डिझाइन करण्यास प्राधान्य देतो. अभिनेत्याकडे जॅकेटचे मोठे कलेक्शन आहे आणि तो अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या जॅकेटचे फोटो पोस्ट करताना दिसतो.

याव्यतिरिक्त धीरजला प्रवास करायला आवडतो आणि तो फिटनेस फ्रीक देखील आहे. महाविद्यालयीन जीवनात अभिनेता खूप खोडकर होता. तो अनेक वेळा कॉलेज बंक करत असे आणि एकदा तो कॅन्टीनमध्ये मित्रांसोबत बसला असताना पकडलाही गेला.

धीरजच्या लव्हलाईफबद्दल बोलायचे झाले, तर तो त्याची पत्नी विनी अरोरा हिला एका टीव्ही शोच्या सेटवर भेटला होता. पहिल्या भेटीतच त्यांना पहिल्या नजरेचं प्रेम झालं होतं. पुढे जवळीक वाढू लागली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली.

धीरज आणि विनीने जवळपास ६ वर्षे एकमेकांना डेट केले. त्यानंतर २०१६मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या जोडप्याच्या लग्नाला त्यांचे सर्व मित्र आणि जवळचे नातेवाईक उपस्थित होते.

हेही वाचा-

हे देखील वाचा