सहकलाकारापासून बनले आयुष्याचे साथीदार; वाचा धीरज धूपर- विन्नी अरोराच्या ‘हॅपी मॅरिड लाईफ’चं गुपित


ग्लॅमर क्षेत्राबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक गैरसमज ठासून भरला आहे आणि तो म्हणजे या क्षेत्रात नाती टिकत नाही. मग ते कोणतेही असो. खासकरून नवरा बायको यांच्या नात्याबद्दल असे गैरसमज खूप आहेत. काही अंशी ते खरेसुद्धा आहे. मात्र हा नियम सर्वानाच लागू होतो असे बिलकुल नाहीये. प्रत्येक नियमाला जसे अपवाद असतात तसे याला देखील आहे. या क्षेत्रात असेही काही कलाकार आहेत, ज्यांनी त्यांचे नाते टिकवत सुखाने संसार केला आहे. याच यादीतील टेलिव्हिजन क्षेत्रातील एक जोडी म्हणजे धीरज धूपर आणि त्याची पत्नी विन्नी अरोडा.

झी टीव्हीची लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य’मध्ये करण लूथराच्या भूमिकेत दिसणारा धीरज मालिकेत तर खूप हिट आहे. मालिकेत करण आणि प्रीताची जोडी तर लोकप्रिय जोडी आहे. मात्र रियल लाइफमधील त्याची आणि त्याच्या पत्नीची जोडी काही कमी लोकप्रिय नाहीये. आज आम्ही तुम्हाला या दोघांची स्टोरी सांगणार आहोत. सोबतच त्यांच्या यशस्वी लग्नाचे गुपित सांगणार आहोत.

या दोघांची पहिली भेट ‘माता-पिता के चरणों में स्वर्ग’ मालिकेच्या सेटवर झाली होती. पहिल्या भेटीतच हे दोघं एकमेकांना आवडू लागले होते. हळूहळू त्यांची मैत्री झाली आणि नंतर ते प्रेमात पडले. या दोघांनी त्यांचे नाते नेहमीच सर्वांपासून लपवले. मात्र मालिकेत त्यांची केमिस्ट्री दिसून आली. हे दोघं जवळपास सहा वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. जवळच्या मित्र आणि नातेवाइकांमध्ये यांचा लग्नसोहळा संपन्न झाला.

एका मुलाखतीमध्ये धीरजने सांगितले की त्याला विन्नीमध्ये काय आवडते. तो म्हणाला, “विन्नीला अभिनयक्षेत्रातील वेळ आणि अवेळ माहित आहे. ती या क्षेत्राचा भाग असल्याने तिला या क्षेत्रातील चांगले-वाईट सर्व माहित आहे. त्यामुळे ती खूपच समजुतदार आहे. मला जेव्हा जेव्हा तिची गरज असते, तेव्हा ती माझ्यासोबतच असते.” तर विन्नीला धीरज जसा आहे तसेच पसंत आहे. ती स्वतःला खूप नशीबवान समजते की तिला धीरज सारखा साथीदार मिळाला.

या दोघांच्या सुखी वैवाहिक जीवनाचे गुपित त्यांनी सांगितले की, “तुमच्या साथीदाराच्या मनासारखे वागा, सुट्यांवर जा, सरप्राइज द्या.” लग्नानंतर या दोघांच्या आयुष्यात बराच फरक पडला आहे. त्याबद्दल विन्नी सांगते, “लग्नानंतर मी स्वतःला ओळखू लागली. माझे जीवन लग्नानंतर अजून मजेदार झाले आहे. लग्नानंतर मला मी आतून बाहेरून समजू लागली आहे. माझी जबाबदरी ओळखू लागली आहे.”

एक पतिपत्नी असण्यासोबतच हे दोघे मित्र मैत्रीण देखील आहे. धीरज कोणताही निर्णय घेताना विन्नीचे मत नेहमी जाणून घेतो. हे दोघं बऱ्याच काळापासून सोबत दिसले नाहीये. त्यांना सोबत काम करायचे आहे, मात्र सध्या ते एका चांगल्या स्क्रिप्टची वाट बघत आहेत. शिवाय त्यांना एका डान्स शोमध्ये देखील भाग घ्यायचा आहे, कारण विन्नी चांगली डान्सर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘एवढी नकारात्मकता आणता तरी कुठून?’ ‘सिडनाझ’बाबत पसरलेल्या बातम्यांवर सिद्धार्थचे उत्तर

-शिल्पा शेट्टी बराचद्या सापडलीय वादाच्या भोवऱ्यात; अंडरवर्ल्ड कनेक्शनचा होता आरोप, तर बोल्ड फोटोशूटमुळेही होती ती चर्चेत

-‘द कश्मीर फाइल्स’ सिनेमाच्या लाईन प्रोड्युसरने नैराश्यामुळे केली आत्महत्या; अनुपम खेर यांनी पोस्टद्वारे दिली माहिती


Leave A Reply

Your email address will not be published.