टेलिव्हिजनवरील ‘झी रिश्ते अवॉर्ड’ कार्यक्रम नुकताच पार पडला आहे. या कार्यक्रमासाठी सगळेच खूप आतुरतेने वाट पाहात होते. प्रेक्षकांमध्ये आपल्या आवडत्या कलाकाराला कोणता अवॉर्ड मिळाला हे बघण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक असतात. या कार्यक्रमामध्ये एका अभिनेत्रीला अॅवॉर्ड मिळाल्यानंतर तिने आपला सहकलाकार याची आठवण काढत ती एवढी भावूक होते की, भरल्या मंचावर जाऊन खूप अश्रू ढासळते.
‘झी रिश्ते अवॉर्ड’ (Zee rishtey Awards 2022) पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला झीवरील सगळ्याच कुटुंबाने हजेरी लावली होती. लोकप्रिय मालिका ‘कुंडली भाग्य'(Kundali Bagya) हे कुटुंबदेखिल या कार्यक्रमात सहभागी होते. अभिनेत्री श्रद्धा आर्या(Shraddha Arya) ऊर्फ प्रिता ही देखिल आपल्या कुटुंबासोबत दिसली. पण तिला जेव्हा अवॉर्ड मिळतो तेव्हा ती आपला सहकलाकाराची आठवण काढून खुपच रडते. श्रद्धाला पहिल्यांदाच लग्न झाल्यानंतर असे रडताना पाहून सगळेच हैराण होतात.
झी रिश्ते कार्यक्रमामध्ये श्रद्धा आर्या आणि शक्ती अरोरा (Shakti Arora) यांच्या जोडीला फेवरेट जोडी म्हणून अवॉर्डही मिळाला होता. मात्र, मंचावर पोहोचल्यानंतर श्रद्धा खूपच भावूक होते. तिला धिरज धूपर(dheeraj dhoopar) याची आठवण येते, तिचे अश्रू अनावर होतात आणि ती ढसा ढसा रडू लागते. सगळे तिला पाहून हैराणच होतात सगळ्यांना प्रश्नच पडला की, ती एवढी का रडत आहे? तेव्हा ती सांगते की, “एक सेकंदासाठी मला वाटले की, फेवरेट जोडी हा अवॉर्ड आम्हाला का मिळत आहे. आमची जोडी तर आताच बनली आहे. मग मला समजले की, हा अवॉर्ड आमच्या जोडीला नाही तर प्रिता आणि करणच्या जोडीला मिळाला आहे.” असे सांगत ती ढसाढसा रडू लागली.
श्रद्धाला असे रडताना पाहून चाहतेही खूपच भावूक होतात, ती अजूनही आपला जुना सहकलाकार धिरज धूपर याला आजही विसरु शकली नाही. कारण श्रद्धा आणि धिरज यांच खूपच चांगलं नातं होतं. त्यांना काही सीन करत असताना डायलॉग पाठ करायचीही गरज नसायची. पण आता मात्र, या मालिकेत धिरज नसून करणच्या भूमिकेत शक्ती अरोरा दिसत आहे. पण तरीही श्रद्धा सोबत चाहत्यांनाही पूर्वीच्याच करण प्रिताचीच जोडी आवडत होती. चाहत्यांनाही वाटत आहे की, पूर्वीचा करण मालिकेत परत यायला पाहिजे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
जगाला अहिंसेचा धडा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित सिनेमे, एका क्लिकवर पाहा यादी
गर्लफ्रेंड म्हणून चालेल, पण अर्जुनची बायको बनायला तयार नाही मलायका? म्हणाली, ‘मला नाही जमायचं’