‘कुंडली भाग्य’ फेम ‘या’ अभिनेत्रीने गुपचूप उरकले लग्न; विवाहसोहळ्याचे फोटो होतायेत व्हायरल


आता कोरोनाचा प्रकोप जरी कमी झाला असला, तरी मागच्या दोन महिन्यांमध्ये कोरोनाने २०२० सालापेक्षाही जास्त मोठे नुकसान केले आहे. कोरोना असूनही मनोरंजनाच्या क्षेत्रात सनई चौघड्यांचे सूर ऐकू येत आहेत. कोरोनाचे सर्व नियम आणि अटी पाळून अनेक कलाकारांनी लगीनगाठ बांधली आहे. यामध्ये टेलिव्हिजन क्षेत्रही मागे नाही. टीव्हीवरील अनेक कलाकारांनी लग्न केले आहे.

झी टीव्हीवरील तुफान लोकप्रिय असणाऱ्या ‘कुंडली भाग्य’ या मालिकेतील अभिनेत्री ईशा आनंदने देखील लग्न केले आहे. ईशाने तिचा बॉयफ्रेंड वासदेव सिंग जसरोटियासोबत सात फेरे घेतले. तिने हे लग्न तिच्या होमटाऊनमध्ये म्हणजेच राजस्थानमध्ये केले आहे. २ फेब्रुवारी २०२१ रोजी या दोघांनी कोर्ट मॅरेज केले, तर नुकतेच २ मे २०२१ ला त्यांनी हिंदू पद्धतीनुसार लग्न केले. लग्नाच्या दिड महिन्यानंतर ईशाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

एका मुलाखतीमध्ये ईशाने सांगितले की, “कोरोनामुळेच आम्ही आमचे लग्न गुपचूप आणि साध्या पद्धतीने केले. सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन, पाहुण्यांची कोरोना टेस्ट आदी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करत आम्ही लग्न केले. खरं तर मला माझ्या संपूर्ण नातेवाईक, मित्रमंडळींना सोबत घेऊन हा सोहळा संपन्न करायचा होता. अतिशय धुमधडाक्यात लग्न करायचे होते. मात्र कोरोनामुळे आम्हाला हे शक्य झाले नाही. त्यामुळे आम्ही आमचे लग्न पुढे ढकलण्याचे ठरवले. मात्र परिस्थिती सुधारत नव्हती. अखेर आमच्या घरच्यांना आम्ही छोट्याखानी पद्धतीने लवकरात लवकर लग्न करावे असे वाटत होते. त्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने लग्न केले.”

ईशाने तिच्या आणि वासदेवच्या लव्हस्टोरीबद्दल सांगताना म्हटले की, “माझी आणि वासदेवची पहिली भेट एका कॉमन मित्राच्या पार्टीत झाली. माझे नुकतेच ब्रेकअप झाले होते. मी पार्टीत होते तेव्हा आमच्या मित्राने आमची ओळख करून दिली. पुढे आम्ही बोलायला सुरुवात केली. आधी मैत्री आणि नंतर प्रेम असा आमच्या प्रेमाचा छोटा आणि अविस्मरणीय प्रवास झाला.”

वासदेव हा एका खाजगी एयर कंपनीमध्ये पायलट असून, ईशा आनंदने ‘छोटी सरदारनी’, ‘कुंडली भाग्य’, ‘सुपर सिस्टर्स’ सारख्या काही मालिका केल्या आहेत. सोबतच ती ‘एमटीवी स्प्लिट्सविला’च्या ९ पर्वात देखील दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस


Leave A Reply

Your email address will not be published.