Friday, April 3, 2026
Home टेलिव्हिजन ‘कुंडली भाग्य’ मालिकेच्या सेटवर पृथ्वीचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी

‘कुंडली भाग्य’ मालिकेच्या सेटवर पृथ्वीचा अपघात, अभिनेता गंभीर जखमी

झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका कुंडली भाग्य गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. यामधील प्रत्येकच पात्राने चाहत्यांच्या मनात मोठं स्थान निर्माण केलं आहे.  खलनायकी भूमिका साकारणारा पृथ्वा म्हणजेच संजय गगनानी याच्याविषयी एक धक्कदायक बातमी समोर येत आहे. कुंडली भाग्य मालिकेच्या सेटवर शुटींगदरम्यान अभिनेत्याचा मोठा अपघात झाला आहे.

संजय गगनानी (Sanjay Gagnani) याने आपल्या दमदार अभिनयाने अनेक मालिकांमध्ये ठसा उमटवला आहे मात्र,  कुंडली भाग्य मालिकामधील ‘पृथ्वी’च्या  भूमिकेमुळे त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. याच मालिकेच्या सेटवर शुटिंग दरम्यान संजयचा अपघात झाला आहे ज्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. (Sanjay Gagnani Injured At Kundali Bhagya Shooting set )

संजयचा शुटींग दरम्यान अपघात झाल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याला त्वरित रुग्णालयात दाखल केलं. यानंतर अभिनेत्याने स्वत: आपल्या इंस्टग्रामवर अपघाताची बातमी शेअर केली. त्याशिवाय त्याच्यासोबत असं पूर्वीही घडलं आहे असंही त्याच्या पोस्टमध्ये सांगितलं आहे. संजयने पोस्ट शेअर करत लहिले की, “1562 व्या वेळा. हे तुमच्या एंटरटेनमेंटसाठी. अ‍ॅक्टर्सचं आयुष्य.” अभिनेत्याच्या या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांना त्याची काळजी लागली आहे. त्यामुळे चाहत्यांदेखिल त्याने शेअर केलेल्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव करत त्याची तब्येत विचारली आहे.

sanjay gagnani post
Photo Courtesy: Instagram/sanjaygagnaniofficial

संजयने कुंडली भाग्य मालिकेतील खलनायकी भूमिकेसाठी अवॉर्डही मिळवला आहे. त्याशिवाय अनेक कलाकारांनी  संजयच्या भूमिकेचं कौतुकही केलं आहे. संजयने ‘बैरी पिया’ या मिलकेपासून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने ‘हमारी देवरानी’, ‘एक वीर की अरदास वीरा’, ‘सावधान इंडिया’, ‘एक रिश्ता साझेदारी का’, ‘सी आयडी’, ‘नागिन 4’ सारख्या गाजणाऱ्या अनेक मालिकांमध्ये आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

संजयच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने टीव्ही अभिनेत्री पूनम प्रीत भाटिया (Poonam Preet Bhatia) हिच्यासोबत विवाह बंधनात अडकला आहे. गेल्या 10 वर्षापासून हे एकमेकांना डेट करत होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘हे तर काहीच नाय’ शोमध्ये प्रेक्षकांना रमेश देव यांना अनुभवायची मिळणार शेवटची संधी, निधनापूर्वी लावली होती शोमध्ये हजेरी
चित्रपटांपासून दूर असूनही बक्कळ पैसा कमावते शमिता शेट्टी; पण मिळवू शकली नाही बहीण शिल्पासारखं यश

हे देखील वाचा