‘म्हणून मला खूप जगावसं वाटतं…’, विनोदवीर कुशल बद्रिकेने मुलासोबतचा गोंडस फोटो शेअर करत दिले भन्नाट कॅप्शन

Kushal badrike share a photo with his son on social media


आपल्या विनोदी अभिनयाने आज घराघरातील लोकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. त्याच्या दिलखुलासा अभिनयाने आणि विनोदाने आज कितीतरी लोकांच्या आयुष्यातील दुःख कमी झाले आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम तर सर्वानाच माहिती आहे. या कार्यक्रमाची खासियत म्हणजे यातील कलाकार. प्रत्येकामध्ये एक वेगळेच टॅलेंट दडलेलं आहे. अनेक वेळा ‘फारुळे बाई’, ‘पत्रकार’, ‘पोलीस’ यांसारख्या अनेक भूमिकेतून प्रेक्षकांना हास्याच्या महासागरात सोडून देणारा विनोदीवीर म्हणजे कुशल बद्रिके. कुशल हा सोशल मीडियाचा देखील पुरेपूर वापर करत असतो. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कुशल बद्रिकेने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो त्याच्या मुलासोबत आहे. कुशल आणि त्याच्या मुलाने दोघांनीही निळ्या रंगाचा टी- शर्ट घातला आहे तसेच डोळ्यावर चष्मा लावला आहे. या फोटोपेक्षा या फोटोंचे कॅप्शन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “म्हणून मला खूप जगावसं वाटतं. आपण आपल्या पुरताचं जग ठरवावं म्हणजे जग सुंदर वाटू लागतं.”

कुशलने या फोटोत त्याची पत्नी सुनैना बद्रिके हिला देखील टॅग केले आहे. त्याचा हा फोटो त्याच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. सगळेजण या फोटोवर कमेंट करून या बाप- लेकाच्या जोडीचे कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “तुम्ही दोघे पण खूप छान दिसत आहात.” दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे, “सुंदर विचार.”

कुशल बद्रिके याने चला हवा येऊ द्यामध्ये येण्याच्या आधी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘बायोस्कोप’, ‘डावपेच’, ‘स्लॅमबुक’, ‘रंपाट’, ‘लूज कंट्रोल’, ‘जत्रा’, ‘खेळ मांडला’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच त्याने ‘फू बाई फू’मध्ये देखील काम केले आहे. तिथूनच तो नावारूपाला आला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.