एकविसाव्या शतकात सोशल मीडिया हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सगळेच सोशल मीडियाचा वापर करत असतात. आपल्या आयुष्यातील चांगल्या-वाईट घटना, आनंद, दुःख, राग या भावना व्यक्त करण्याचं सोशल मीडिया एक प्रभावी माध्यम आहे. यातच सोशल मीडियावर आजकाल सगळेच व्यायाम करताना, योगा करतानाचे फोटो शेअर करत असतात. खरं तर आजकाल हे ट्रेंडचं मानलं जाते. याच ट्रेंडवर सगळ्यांचा आवडता अभिनेता आणि विनोदवीर कुशल बद्रिके याने दिलखुलास पद्धतीने निशाणा साधला आहे. कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ती सध्या तुफान व्हायरल होत आहे. (Kushal badrike’s post viral on social media)
कुशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने लिहिले आहे की, “मी खूप चिंतेत आहे, जर मी व्यायाम आणि योगाचे फोटो पोस्ट केले नाहीत, तर हा सोशल मीडियाचा समाज मला स्वीकारेल का??”
कुशलने अत्यंत मजेशीर पद्धतीने त्याची ही चिंता व्यक्त केली आहे. त्याची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. अनेक कलाकार त्याच्या या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने हसण्याची इमोजी पोस्ट केली आहे, तर अभिनेत्री हेमांगी कवी हिने लिहिले आहे की, “तू जर व्यायाम आणि योगा करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकले, तर लोकं चिंतेत येतील त्याचं काय?? ती जबाबदारी कोणाची??” त्याचे अनेक चाहते या फोटोवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.
कुशल बद्रिके हा एक विनोदी कलाकार आहे. तो सध्या झी मराठीवरील सर्वात चर्चेत असणारा शो ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये काम करत आहे. त्याने ‘चला हवा येऊ द्या’मध्ये येण्याच्या आधी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याने ‘बायोस्कोप’, ‘डावपेच’, ‘स्लॅमबुक’, ‘रंपाट’, ‘लूज कंट्रोल’, ‘जत्रा’, ‘खेळ मांडला’ या चित्रपटात काम केले आहे. सोबतच त्याने ‘फू बाई फू’मध्ये देखील काम केले आहे. तिथूनच तो नावारूपाला आला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










