अमिताभ बच्चन यांची नात नव्यासोबतच्या रिलेशनशीपवर मीझान जाफरीने सोडले मौन; म्हणाला, ‘ती माझी…’


मनोरंंजन क्षेत्रात जितकी चर्चा कलाकारांची होते, तितकीच चर्चा त्यांच्या मुलांचीही होते. कधी त्यांच्या आलिशान गाड्यांची, फॅशन स्टाईलची, तर कधी त्यांच्या प्रेमप्रकरणांची चर्चा होत असते. आता असेच काहीसे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा आणि अभिनेते जावेद जाफरी यांचा मुलगा मीझान जाफरीबाबत घडले आहे. नव्या आणि मीजान त्यांच्या रिलेशनशीपच्या बातम्यामुळे चर्चेत आहेत. मात्र, मीझानने या रिलेशनशीपवर मौन सोडले आहे. (Actor Meezaan Jafferi Opens Up On Relationship With Amitabh Bachchan Grandduaghter Navya Naveli Nanda)

खरं तर सन २०१८ मध्ये अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीसोबत मीझानचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. हा फोटो कोणत्या तरी पार्टीदरम्यान घेण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशीपबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या.

नुकतेच लीडिंग डेलीसोबत बोलताना मीझानने खुलासा केला की, कशाप्रकारे त्याला आई- वडील विचारतात की, त्याच्यात आणि नव्यामध्ये काय शिजत आहे? त्याने हेही सांगितले की, जेव्हा तो अमिताभ बच्चन यांच्या घरी ‘जलसा’ जातो, तेव्हा त्याच्यामागे पॅपराजी हात धुवून लागतात. हे त्याला विचित्र वाटते.

मीझान म्हणाला की, “खूप आधी कोणीतरी मला नव्याबाबत विचारले होते, तेव्हा मी मलाल चित्रपटाचा प्रचार करत होतो. माझ्यासाठी ते हैराण करणारी बाब होती. मात्र, प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तर मी आणि नव्या जवळचे मित्र आहोत आणि मला वाटते की, माझ्यामुलेच तिचे नाव खूप ठिकाणी आले, जे योग्य नाहीये. हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. मी तिच्या कुटुंबाला सामील करू इच्छित नाही. यावेळी इतर कोणाबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही.”

त्याने पुढे सांगितले की, त्याचे वडील जावेद जाफरीही आमच्यात काय सुरू आहे, याचा विचार करत होते. यावर तो म्हणाला, “त्यावेळी मला माझ्याच घरात जाणे विचित्र वाटत होते. माझे आई-वडील मला पाहत होते. त्यांनी म्हटले की, काय आहे? मी म्हटले की, मला नाही माहिती काय आहे. मी जलसावर शेवटचा दिवाळी पार्टीमध्ये गेलो होतो. तिथे संपूर्ण इंडस्ट्री उपस्थित होती.”

यापूर्वीही मीझान आपल्या आणि नव्या नवेली नंदाच्या रिलेशनशीपवर बोलला आहे. यापूर्वी त्याने म्हटले होते की, “नव्या माझ्या बहिणीची आणि माझी खास मैत्रीण आहे. मी कोणत्याही रिलेशनशीपमध्ये नाहीये.”

मीझानच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने सन २०१९ मध्ये ‘मलाल’ या चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केले होते. याव्यतिरिक्त त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून ‘पद्मावत’ चित्रपटात काम केले होते. तो आता ‘हंगामा २’ चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.